single-post

भारतरत्न" डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजन-सुनील जाधव

वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन

06 April, 2025

  सातारा दि.6: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी. तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी दि. 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त  सुनिल जाधव यांनी साप्ताहिक जरंडेश्वर समाचारशी बोलताना दिली.

        या कार्यक्रमांतर्गंत जिल्हयातील शाळा महाविद्यालये वसतिगृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन, विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचे प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, समतादूतामार्फत ग्रामीण व शहरी भागामध्ये पथनाटय व लघुनाटिकाव्दारे विविध योजनांचे प्रबोधन, मार्जिन मनी योजनेतंर्गंत कार्यशाळेचे आयोजन, महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी व्याख्यान, संविधान जागर, महिला मेळाव्याचे आयोजन, जेष्ठ नागरीकासाठी जनजागृती शिबीर व मेळावा तसेच आरोग्य शिबीर, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यामधून स्वच्छता अभियान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन व इतर कार्यक्रम, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान मेळावा व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत ऑनलाईन व्हॅलिडीटी प्रमाणपत्राचे प्रदान इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमांचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त  सुनिल जाधव यांनी  केले आहे.