single-post

साताऱ्यात पहिला म्युझिकल रस्ता -ना. शिवेंद्रराजे भोसले

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त स्त्याचे उद्घाटन

31 March, 2025

सातारा दि.३०: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साता-यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक या मार्गावर देशातील पहिला म्युझिकल रोड करण्यात आला आहे. या रस्त्यावरील डेकोरेटिव्ह लॅम्पवर स्पीकर बसवण्यात आले आहेत. पहाटेच्यावेळी भक्तिसंगीताच्या सुरांनी हा परिसर सुमधुर स्वरांनी येणाऱ्या लोकांना भारावून टाकणार आहे.  सातारकरांना  नवीन देशात आल्याचा भास होईल आणि आध्यात्मिक अनुभव मिळेल. या म्युझिकल रोडचे ना. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते लोकार्पण होणार आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक हा मार्ग पूर्वी अत्यंत खराब खाच खळग्याचा होता. वाहन चालवताना जिल्ह्यातील अनेक लोकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती साताऱ्यातील याच नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक मार्गावर आता मॉर्निंग वॉकवेळी फिरायला येणाऱ्या लोकांना सुमधूर भक्तीसंगीत ऐकायला मिळणार आहे.  बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या संकल्पनेमुळे या मार्गाचे रूपडे पालटले आहे. नगरोत्थान योजनेतून या मार्गासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली. कधीकाळी साताऱ्यातील सर्वात खराब असलेला मार्ग आता सर्वात सुंदर व आधुनिक बनला आहे.ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी अभिजीत बापट व नगर अभियंता दिलीप चिद्रे यांच्या सुचनेनुसार या मार्गावर अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या म्युझिकल रोडवर बसवण्यात आलेल्या स्पीकर व्यवस्थेचे संपूर्ण नियंत्रण नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातून करण्यात येणार आहे. हे संपूर्ण काम ए. एस.म्युझिकल रोड हा फक्त बाहतुकीसाठी नव्हे तर तो एक वेगळा अनुभव देणारा मार्ग आहे. साताऱ्याच्या नागरिकांसाठी आम्ही हा म्युझिकल रोड खास तयार केला असून भविष्यात आणखी असे उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे. पन्नास वर्षे रस्त्याला खड्डे पडणार नसल्याचे अनिल देसाई यांनी यावेळी साप्ताहिक जरंडेश्वर समाचार शी बोलताना सांगितले - अभिजीत बापट मुख्याधिकारी सातारा, देसाई इन्फ्रा यांनी  पहिल्यांदाच असा अनोखा रस्ता तयार करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. पहाटेच्यावेळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना भक्तिसंगीताचा आनंद घेता येणार आहे. तसेच रात्रीच्यावेळी हा रस्ता प्रकाशयमय दिसत असल्याने त्याचे देखणे सौंदर्य आणखी खुलून उठून दिसत आहे.