single-post

जिल्ह्याची ओळख दारू- जुगार- क्लब- मटक्याचं चक्री जुगार होऊ नये म्हणून आंदोलन -संजय गाडे

बुधवार दि.१२मार्च रोजी आंदोलन स्थळी हलगी वादन आंदोलन

11 March, 2025

सातारा दि.११ : सातारा जिल्ह्याची ओळख पुरोगामी जिल्हा म्हणून आहे,आता याच जिल्ह्याची ओळख दारू- जुगार- क्लब- मटक्याचं चक्री जुगार होऊ नये म्हणून  या विरोधात (आर पी आय )रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाधक्ष संजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, जिल्हाधिकारी परिसर आंदोलन स्थळी जोरदार घोषणाबाजीने दणाणून गेला होता,

या आंदोलनामुळे सातारा पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे,सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दि. ७ मार्च २०२५ रोजी चक्री जुगार मटक्या तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होते तसे  लेखी निवेदन दिले होते. कारवाईची अपेक्षा ठेवली होती. परंतु, साधी एकही कारवाई करण्याचे धारिष्ट सातारा पोलीस दलाने दाखविले  नाही. शिरवळ खंडाळा वाई येथील दोन व्यक्ती सातारा जिल्ह्यामध्ये आय.डी. वाटप करून चक्री जुगार जोमाने चालवत आहेत.

सातारा जिल्ह्यातील शिरवळ खंडाळा व वाई येथील दोन व्यक्ती आयडी वाटप करून चक्री जुगार संपूर्ण सातारा जिल्ह्यात खुलेआम-पणाने चालवत आहेत या चक्रीकांडमध्ये पोलीस दलातील प्रत्येक घटकाला या चक्रीकांची कल्पना असून सुद्धा खेळाडू वृत्तीने याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जुगार मटका बुकिंग यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी सक्षम पोलीस अधीक्षकाची गरज असल्याचे बोलले जात आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलनाची वेळ आणणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महसूल व पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांबाबत आता सहानभूती राहिलेली नाही. असे स्पष्ट करून संजय गाडे यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यात आठ आमदार व दोन खासदार असूनही चार मंत्रिपद दिलेले आहे. चक्रीकांड बाबत कुठे आहे कायदा? कुठे आहे पोलीस अधीक्षक? कुठे आहे जिल्हाधिकारी ? सर्वत्र आहे नुसतेच हप्ते….अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत  कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजय गाडे, विशाल कांबळे व महेश शिवदास यांच्यासह रिपब्लिकनचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. बुधवार दि.१२मार्च २०२५रोजी या आंदोलन स्थळी हलगी वादन करून पोलिसांपर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न रिपब्लिकन चे कार्यकर्ते यांच्या कडून केला जाणार आहे असे आंबेडकरी चळवळीतील आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.