single-post

कोरेगाव शहरात तरूण युवकाचा 'खून'

कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल, खुनाचे कारण अस्पष्ट; कोरेगाव शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

11 March, 2025


 कोरेगाव, दि. १० : कोरेगाव येथील आझाद चौक येथे रस्त्याच्या एका कापड विक्री करणाऱ्या दुकानामध्ये प्रतिक राजेंद्र गुरव वय वर्ष २४, रा. ल्हासुर्णे ता.कोरेगांव या युवकांचा गळा आवळून खून करण्यात आलेला आहे.

 प्रतीक राजेंद्र गुरव  असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र संशयित बाबू ऊर्फ ओंकार संजय जाधव ( रा. ल्हासुर्णे) याला रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केलेली आहे.

प्रतीकच्या खूनप्रकरणी भाऊ अजय राजेंद्र गुरव (रा. ल्हासुर्णे) याने कोरेगाव पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केलेली आहे.खुनाचे कारण अस्पष्ट आहे.

  पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार प्रतिक राजेंद्र मुरव हा कोरेगाव शहरातील एका कपड्याच्या दुकानात कामाला होता.कोरेगाव नवीन एसटी स्टँड रस्त्यावर असलेल्या कपड्याच्या दुकानात ओंकार हा कामावर होता. प्रतीक हा रविवारी दुकानात आला होता. हे दोघेही मित्र असून, त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद उफाळून आला. यातूनच ओंकारने प्रतीकचा  खून केला. पोलीसांनी दुकानाचे शटर उपडून आत गेल्यावर दुकानराच्या एका कोपऱ्यात प्रतिक बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले.  वडील राजेंद्र गुरव यांनी  खाजगी गाडीमध्ये घालून प्रतिक याला शहरातील खाजगी रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी शासकीय स्णालयात घेऊन जावे असा सल्ला दिला.त्यानंतर कोरेगावच्या उपजिल्हा सख्णालयात  दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता  प्रतिक यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेमुळे कोरेगाव शहरात उलटसुलट चर्चेला मोठ्या प्रमाणात ऊत आलेला आहे. या घटनास्थळाला डीवायएसपी सोनाली कदम व पोनि. घनश्याम बल्लाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली व पाहणी केली. तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाची चक्रे  फिरवण्यात आलेली आहेत. अवघ्या काही तासातच ओंकार जाधवला अटक करण्यात आली असून सोमवारी दिवसभर त्याच्याकडे चौकशी सुरू होती. अधीकचा तपास पोनि.घनश्याम बल्लाळ हे करीत आहेत.

कोरेगाव शहरांमध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचे प्रमाण वाढलेले आहे. या गुन्हेगारांना वेळेत अटकाव न केल्यास कोरेगावातील जनतेची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढणार आहे, याबाबत गृह मंत्रालयाने या गुन्हेगारांना वेळेत आळा घालावा, प्रतिबंध घालावा  अशी चर्चा कोरेगाव शहरांमध्ये रंगू लागली आहे.  जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कोरेगाव तालुक्याची  ओळख आहे.  या शहराला गुन्हेगारीची कीड लागलेली दिसून येत आहे. गुन्हेगारांच्यावर पोलिसांचा वचक नसल्यामुळे कोरेगाव शहरात व तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे.