स्त्रियांचा आत्मसन्मान जागविणे :योगदानाची कृतज्ञ जाणीव शिक्षणातून रुजवावी -उपप्राचार्य शिवाजी राऊत
नगरपालिका प्राथमिक शाळांचा संयुक्त जागतिक महिला दिन संपन्न
09 March, 2025
सातारा दि.८; स्त्रियांचा आत्मसन्मान,श्रम आदर व स्त्री कष्टाची जाणीव आणि समभाव या जाणिवा शिक्षणातूनच रुजवल्या तरच स्त्रीमुक्ती दायी जीवनाचा प्रवास समाज सुरू होईल त्यासाठी शिक्षणातून स्त्रियांच्या कष्टाची कृतज्ञ जाणीव आणि योगदानाची कृतज्ञ भावना रु जवण्याची गरज आहे असे विचार उपप्राचार्य शिवाजी राऊत यांनी व्यक्त केले.
सातारा नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक, दोन, अकरा चौदा यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्त्रीमुक्ती दिन कार्यक्रमात राऊत हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिका शाळा क्रमांक दोनच्या मुख्याध्यापिका नलिनी वाढते नगरपालिका शाळा क्रमांक एकच्या मुख्याध्यापिका भोसले मॅडम या होत्या
याप्रसंगी प्रतिकूल परिस्थिती त संघर्ष करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या कडंबे गावच्या उज्वला सपकाळ यांचा शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन तानाजी मस्के नलिनी वाढते भोसले मॅडम व राऊत यांच्या हस्ते विशेष स्त्रीमुक्ती दिनानिमित्त गौरव करण्यात आला.
महिला दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे राऊत यांच्या हस्ते पुष्प व पुस्तक देऊन गंगावणे मॅडम, दिपाली घाडगे, जरग मॅडम, बागवान मॅडम, दिपाली मोरे, दिया खांडेकर, गाडे मॅडम,श्रीयुत वासाळकर सर वेदांत सर आदी मान्यवरांचा विशेष गौरव या कार्यक्रमानिमित्त करण्यात आला
महिला दिनाच्या गौरव मूर्ती उज्वला सपकाळ यांनी आपल्या भाषणात शिक्षकांची प्रेरणा हाच माझ्या संघर्षाचा आधार होता .प्रतिकूल परिस्थितीतून मी स्वावलंबनाने लोणची तयार करणे ते मसाज थेरपी यासारखे उद्योग करून मी स्वतःच्या पायावर उभी राहिले हाच संघर्षाचा आत्मविश्वास ज्यांनी दिला त्यांच्याप्रती मी नेहमी कृतज्ञ आहे. स्त्रिया प्रतिकूल परिस्थितीत उभ्या राहतात. समाजाने अशा स्त्रियांना सतत मदत करायला हवी स्त्रीमुक्ती म्हणजे गौरव नव्हे तर स्त्रियांना आधार देणे, मदत करणे होय. असेही त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले .
प्रमुख पाहुणे शिवाजी राऊत आपल्या भाषणात म्हणाले की, शिक्षण ही कृतज्ञता आहे. शिक्षण ही समानता आहे. शिक्षण ही सहसंवेदना आहे .शिक्षण ही सेवा सुश्रुषा आहे आणि शिक्षण ही ज्ञानाची निरंतर परिपूर्ती आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एकाग्र श्रवण, एकाग्र निरीक्षण, एकाग्र लेखन, एकाग्र भाषण, या कलागुणांचा विकास प्राथमिक शिक्षणापासून करण्याचा दृढ संकल्प केला पाहिजे. आई हा एक शिक्षक असून आईच्या प्रती प्रत्येक विद्यार्थ्याची कृतज्ञता म्हणजे तिच्या आशा आकांक्षासाठी सतत शिक्षण घेत राहणे होय. ज्ञान मिळवणे ,वाचन करणे होय, शिक्षण ही आत्मविश्वासाची विचार विकासाची प्राप्ती आहे. शिक्षण घेऊन सेवार्थी व्हावे. शिक्षणातून विषमते पलीकडे जावे .शिक्षण समानतेने व बंधुतेने वर्तन करावे ते द्यावे घ्यावे हे काम शिक्षकांनी करावे. गरिबांची मुले घडवणे हे राष्ट्र घडवण्यासारखे काम आहे. शिक्षकी पेशा नाही तर राष्ट्रनिर्माणाचे काम ते आहे. असे समजून गरिबांचा विद्यार्थी हा श्रम संस्कृती ज्ञान ,कौशल्य, यांचा वाहक आहे. तो आदर्श घडवणे हे काम शिक्षकांनी करायला हवे. असा आशावाद राऊत यांनी याप्रसंगी व्यक्त केला
स्त्रीमुक्ती दिनाचे महात्म कथन करताना राऊत म्हणाले की स्त्रीमुक्ती दिन हा गौरवाचा जसा आहे. तसाच कृतज्ञतेचा दिवस आहे .स्त्रियांच्या प्रती त्यांच्या कष्टाच्या प्रती नितांत समतेची, आदराची व न्यायाची भूमिका समाजातील प्रत्येक घटकाने पार पाडणे. ते अमलात आणणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती दिन सतत साजरा करणे होय. स्त्रिया म्हणजे सर्व मानवी जीवनाचा आधार होय. स्त्री मुक्ती हीच जाती निर्मूलन आहे. स्त्रीच विश्वाची निर्मिती आहे. स्त्रीच धर्म, संस्कृती, ज्ञान, कुटुंब भविष्य, घडवणारी ती शक्ती आहे. हा विचार रुजवण्यासाठी स्त्री मुक्ती दिनाची महती समाजाने समजावून घेऊन सातत्याने सर्व काळी स्त्रियांच्या समस्या निरसनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. स्त्री सक्षमीकरण, स्त्री साक्षरता, स्त्रियांना न्याय मिळवून देणे स्त्रियांना प्रतिनिधित्व देणे. स्त्रियांना उच्च स्थानी पोहोचवणे हे काम सामूहिकपणे समाजाला करावे लागेल. तरच स्त्री ही आदर्श कुटुंब ते राष्ट्र व्यवस्थापन करू शकते आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातील न्यायाच्या भूमिका समाज जीवनात कल्याणकारी ठरतात .हे लक्षात घेऊन स्त्रियांच्या प्रगतीचा सर्व घटकांनी विचार करणे. व सहकार्य करणे. अपेक्षित असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
शाळा क्रमांक एक दोन अकरा चौदा च्या विद्यार्थ्यांसाठी संबोधन करताना राऊत म्हणाले मूल म्हणजे फुल, मूल म्हणजे हास्य, मूल म्हणजे हट्ट ,मूल म्हणजे नैराश्य, मूल म्हणजे खेळ, मूल म्हणजे आनंद होय .शाळा म्हणजे ऐकणे. शाळा म्हणजे बोलणे. शाळा म्हणजे भांडणे. शाळा म्हणजे खेळणे होय अशा आनंदही शाळा चालवण्यासाठी शिक्षकांनी आता कथनवादी भूमिका सोडून देऊन भीती दहशत न दाखवता मुलांशी मैत्रीच्या नात्याने मार्गदर्शकाच्या भूमिकेने वागायला हवे आहे. अशी अपेक्षा शिक्षकांच्या कडून व्यक्त केली मूल गरिबांचे नसते. ते सर्वांचे असते. ते मूळ मूल राष्ट्राचे असते. मूल भविष्यासाठी सक्षमी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. हे समजावून घेऊन आजच्या शिक्षकांनी मुलांच्या व्यक्तिमत्त्वातील सुप्त गुणांच्या विकासासाठी बहुविध बुद्धिमत्तेच्या क्षमतेसाठी सर्वांगीण प्रायोगिक प्रयत्न सतत करायला हवेत कथन ,पठण, श्रवण,x निवळ लेखन हे शिक्षण आता उपयोगी नाही. हे शिक्षकांनी समजावून घेऊन जय भीम जय बापू जय संविधान हे तत्त्वज्ञान शिक्षणात अमलात आणायला हवे. तरच शिक्षक हा अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन समाज घडवणारा राष्ट्र निर्माता भविष्य साठी होऊ शकतो .याची कृतज्ञ जाणीव शिक्षकी पेशातील प्रत्येक शिक्षकाच्या अंगी असायला हवी असाही आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
भाषणाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांची प्रश्न उत्तरे झाले फुल का उमलते? पाने का गळतात? स्त्रियांना आदर का द्यावा !आणि आईचे काय ऐकावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राऊत यांनीयाप्रसंगी दिली. व्याख्यानाचे शेवटी त्यांनी बालच्यमंचकडून घोषणा वदवून घेतल्या
वाचणाऱ्या मुलांचा विजय असो
खेळणाऱ्या मुलांचा विजय असो
लेखन करणारीमुले. छान छान मुले
भाषण करणारी मुले छान छान मुले
नाच करणारी मुले छान छान मुले
खेळ खेळणारी मुले छान छान मुले
प्रयोग करणारी मुले छान छान मुले
वाचणारी मुले छान छान मुले मदत करणारी मुले छान छान मुले नियमित शाळेत येणारी मुले छान छान मुले या घोषणा देऊन स्त्रीमुक्ती दिनाचा विजय असो. शिकणाऱ्या मुलांचा विजय असो. अशा आनंदी घोषणाच्या आधारे नगरपालिका शाळा क्रमांक एक, दोन, 11. 14 यांच्यामधील स्त्रीमुक्ती दिन कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्त असा संपन्न Salt.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक वेदांत सर यांनी सर्वांचे कृतज्ञ आभार मानले कार्यक्रमाचे संयोजन करण्यात सर्व शिक्षकांनी मोठे योगदान दिले.