single-post

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सोबत जिल्ह्यातील विविध विकासकामा संदर्भात केली चर्चा

सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जलमंदिर पॅलेस येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची घेतली सदिच्छा भेट

09 March, 2025

सातारा दि.९ :सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जलमंदिर पॅलेस येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली असून जिल्ह्यातील विविध विकासकामा संदर्भात चर्चा केली.

    यावेळी सातारा जिल्ह्यातील  विविध विकासकामा संदर्भात   विविध खात्यांचे अधिकारी यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सातारा येथील औद्योगिक वसाहती मध्ये केंद्रीय MSME मंत्रालय च्या माध्यमातुन Technology Centre उभे करणे, क्षेत्र माहुली येथे केंद्रीय विद्यालय उभारणे, सातारा शहरात आर्चरी, climbing wall व स्केटिंग ग्राउंड उभारणे, दिव्यांग बांधवांसाठी sensory गार्डन विकसित करणे, सातारा आणि कराड रेल्वे स्टेशन साठी नियमित बस सेवा सुरू करणे, सातारा येथील पशुसंवर्धन विभागाची जागा MIDC कडे हस्तांतरित करून त्या मध्ये IT पार्क उभी करणे, कृष्णा नदी च्या माथा ते पायथा प्रदूषण मुक्ती साठी ठोस कृती कार्यक्रम तयार करणे, क्षेत्र माहुली येथे मध्यवर्ती कारागृह साठी जागा हस्तांतरण करणे, सातारा, जावळी, महाबळेश्वर, पाटण तालुक्यातील ज्या गावांना गावठाण निश्चित झालेले नाही अशा गावांना गावठाण निश्चिती करणे. कोयना, कण्हेर, धोम व उरमोडी धरण परिसरात sea plane कार्यान्वित करणे, जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी प्रोत्साहन, चालना देण्यासाठी उपाय योजना करणे व अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झालेली आहे. 

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील, सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री अभिजित बापट, श्री गणेश भोसले, सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री मनोज शेंडे, श्री किशोर शिंदे, श्री. काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील, श्री. संग्राम बर्गे, श्री अशोक घोरपडे, श्री. प्रितम कळसकर , सुनील काटकर, जितेंद्र खानविलकर उपस्थित होते.