single-post

बुद्ध गया विहाराचे व्यवस्थापन बौद्ध धार्मियांकडे दयावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन

बुध्द गया येथील मंदिरावर केवळ बौद्ध नियंत्रणाची मागणी

07 March, 2025

मेढा दि.७(प्रतिनिधी):बिहार येथील बुद्धगया   विहाराचे व्यवस्थापन  ब्राम्हण समाज करीत आहे हे योग्य नाही, बौद्ध भिक्खू यांच्याकडे ते द्यावे,हस्तांतरित करावे, ब्राम्हण लोकांनी, बुध्द गया येथून बाहेर पडावे, त्यांनी त्यांच्या मंदिरात जावावे, बुध्द गया येथील ताबा सोडावा या मागणीसाठी बुद्ध गया येथे सुरू असलेल्या   देशातील व परदेशातील बौद्ध भिक्कू यांनी छेडलेल्या  आंदोलनास तसेच मंदिरावर केवळ बौद्ध नियंत्रणाची मागणीस पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जावली तालुका व भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांच्या वतीने  तहसीलदार  यांना निवेदन सादर करण्यात आले.

   यावेळी  प्रताप सपकाळ आपल्या भावना व्येक्त करताना म्हणाले 1949 चा महाबोधी बुद्धविहार कायदा प्रमाणे तेथे चार  हिंदू धर्मीय  व चार बौद्ध व एक स्थानिक कलेक्टर अध्यक्ष यांची नऊ सदस्यांची ट्रस्टी असते.परन्तु बौद्ध सदस्यांना विचारात न घेता बुद्धविहारात हिंदू धर्मिय कर्मकांड केले जातात , बौद्ध धम्मात कर्मकांड पूजाअर्चा यांना थारा नाही तसेच बुद्धगया हे संपूर्ण बौद्धाचे अस्मितेचे स्थान असून जगभरातून लाखों बौद्ध बांधव येथे भेट देत असतात .परंतु तेथील कर्मकांड बघून संपूर्ण जगात चुकीचा मेसेज जात असल्यामुळे तत्कालीन 1949 चा कायदा रद्द करून, नवीन सुधारित कायदा पारित करावा व महाबोधी विहारातील संपूर्ण व्यवस्थापन बदल करून बौद्धांच्या हाती ताब्यात दयावे अशी मागणी यावेळी शासनाकडे सपकाळ यांनी केली.

 तहसिल कार्यालय परिसर आंबेडकरी कार्यकर्ते यांच्या घोषणाबाजीने परिसद दणाणून गेला होता,वंचित बहुजन आघाडी जावली तालुका अध्यक्ष प्रताप सपकाळ, भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालूका अध्यक्ष बौद्धाचार्य मोहन खरात्, महासचिव योगेश कांबळे, कृष्णकांत सपकाळ, सीताराम कांबळे आंबेघर,  संपत सपकाळ कावडी, उल्हास गायकवाड करहर,बाळासाहेब भोसले आशाताई भिलारकर वालूथ ,संजय गायकवाड ,शिवाजी गायकवाड इंदवली, हरी कांबळे श्रीरंग कांबळे, अ कांबळे आलेवाडी, अशोक जाधव भिवडी,  अशोक् रोकडे सोन्गाव , अनिल् जगताप,सायगाव,मानसिंग खरात अशोक गायकवाड संदेश गायकवाड,अश्विन गायकवाड महिगाव, मोहन चव्हाण हरीश चव्हाण,लक्समन चव्हाण ओझरे, काशिनाथ गाडे,बाळकृष्ण गाडे, गौतम गाडे जयवन्त गाडे भनग , अनिताताई कांबळे महाते, नितीन सपकाळ वाटंबे,राजू तांबे,सुंदर भालेराव सचिन भालेराव अशोक् दिक्षित् मेढा, पुष्पा सोनवणे,सुभाष सोनवणे,दादू सोनवणे संपत सोनवणे वैभव सोनवणे गांजे, मोहन जाधव शेते, प्रकश् कांबळे करंजे, सचिन कांबळे मनोजबाबू कांबळे वैभव, बी परिहार तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बहुसंख्येने आंदोलनास उपस्थित होते.