महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांना दहा वर्षे शिक्षेची तरतूद करावी असा विशेष कायदा करावा -खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधात अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा मंजूर करवा; कमीत कमी १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे-खा उदयनराजे भोसले
07 March, 2025
सातारा दि.६(प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात विशेष कायदा मंजूर करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथील जलमंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. कायद्यात नेमकं काय-काय तरतुदी असल्या पाहिजेत, याबाबतही उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. तसेच या कायद्यात नेमकं काय-काय तरतुदी असल्या पाहिजेत, याबाबतही उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदे मध्ये भाष्य केले .
जनतेचा सहभाग राज्य कारभारात असावा हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. लोकांना एकत्रित केलं आणि त्यातून स्वराज्याची निर्मिती झाली. बाहेरून होणारे आक्रमण महाराजांनी परतवून लावले. हे कोणाच्या जोरावर? सर्व समाजाच्या जोरावर स्वराज्याला योग्य दिशा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आपण आज त्यांच्यामुळे मोकळा श्वास घेत आहोत. पण आज काय चाललंय? आज आपण लोकशाहीत वावरत आहोत. पण कोणीही उठायचं आणि काहीही वक्तव्य करायचं. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. मग सांगितलं जात की कारवाई केली जाईल. या लोकशाहीत केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत.
अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनाच्या काळात माझं प्रामाणिक मत आहे की एक विशेष कायदा पास केला पाहिजे. कायदा असा पाहिजे की परत कोणी काही बोलण्याचं धाडस केलं नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत बोलण्याचं कोणी धाडस करता कामा नये. याबाबत अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा मंजूर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये कमीत कमी १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे, अशी तरतूद करण्याची गरज आहे. अशा घटनांची चौकशी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करावी अशीही तरतूद केली पाहिजे. तसेच अशा प्रकरणातील दोषारोपपत्र किमान ३० दिवसांत दाखल झालं पाहिजे आणि या गुन्ह्याचा निकाल सहा महिन्यांत लागला पाहिजे असा कायदा करावा, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी आज झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत महटले आहे.ओरंगजेब हा लुटारू होता, औरंगजेब यांची कबर उखडून टाका असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पत्रकारांना मुलखात देताना म्हणाले.