कोरेगाव शहर कचरामुक्त करण्याच्या अभियानास प्रारंभ-उपनगराध्यक्ष राहूल बर्गे
ओल्या सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट पीठ तयार करण्यासाठी अद्यावत यंत्रणा उभारणीचे कामास वेग
07 March, 2025
कोरेगाव दि.६(प्रतिनिधी) : कोरेगाव शहरातील कचरा समस्येवर मार्ग काढण्यासाठी नगरपंचायतीच्यावतीने एमआयडीसीतील पंप हाउसच्या पाठीमागे ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे माहिती कोरेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राहूल बर्गे यांनी जरंडेश्वर समाचारशी बोलताना दिली आहे.
कंपोस्ट पीठ उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच पूर्ण होईल असे बर्गे म्हणाले, गुरुवारी दुपारी तयांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्षा दिपाली बर्गे, मुख्याधिकारी विनोद जळक नगरसेवक उपस्थित होते. लवकरच कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. या कामावर व्यक्तिगत लक्ष दिले जात असून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपोस्ट पीठ उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेले आहे. कोरेगाव ग्रामस्थ यांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे राहुल बर्गे म्हणाले,या कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या दिल्या आहेत.
हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील ओला कचऱ्यावर कायमस्वरूपी निकालात निघणार आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन शहराच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.