single-post

माहिती अधिकार कायदयाने जाबदायित्व व पारदर्शकता प्रस्थापित व्हावी- प्राचार्य शिवाजी राऊत

कराड नगरपरिषद माहितीचा अधिकार कार्यशाळा संपन्न

25 February, 2025

कराड दि. २५(प्रतिनिधी): भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हे पारदर्शकते शिवाय प्रस्थापित होत नाही पारदर्शकता गतिमान आणि जाबादायित्व ही शासन कारभारात प्रस्थापित व्हावे हाच माहितीच्या अधिकाराचा हेतू आहे. कायद्याचे काटेकोर पालन शासन प्रतिनिधींनी करणे ही  लोकशाहीच्या सक्षमीकरणाची गरिबीं निर्मूलनाची स्वयं कृती आहे. हे समजावून घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांनी कारभारात गतिमानता  आणावी सर्व अभिलेख अद्यावत ठेवून ती प्रस्थापित करावी असे आवाहन प्राचार्य शिवाजी राऊत यांनी केले.

कराड नगरपरिषद कराड यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या साठी आयोजित माहितीच्या अधिकार कार्यशाळेच्या विशेष व्याख्यानात राऊत हे बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्य  अधिकारी शंकरराव खंदारे हे होते. विशेष उपस्थिती उपकार्यकारी अधिकारी सौ पाटील मॅडम. तसेच  प्रफुल्ल कुमार वनखेडे प्रशासकीय अधिकारी यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. 
माहितीचा अधिकार कायदा हा सार्वजनिक हितासाठी आहे असे अर्ज निर्गत करणे ही जन माहिती अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे माहिती देणे हा नियम आहे माहिती नाकारणे हा अपवाद आहे. हे सर्व कामकाज करण्यासाठी आपल्या अंतर्गत कार्यासनाचे सर्व अभिलेख अद्यावत ठेवणे सूचीबद्ध करणे नोटीस वर्ड वर लावणे आणि स्वयंघोषित कलम चार अंतर्गत करणे ही एक जबाबदारी शासनाच्या प्रत्येक प्राधिकरणाची आहे याची जाणीव कलम चार अंतर्गत राऊत यांनी करून दिले. माहितीची व्याख्या शासन निधी कामात खर्च होतो अशा संबंधित सर्व प्रकारचे अभिलेख दोन फमाहितीच्या व्याख्येत येतात

राऊत पुढे म्हणाले की सत्यमेव जयते हे भारतीय घोषवाक्य कारभारातील नियमांच्या अनुपालनातून सिद्ध करून दाखवण्याचे घोषवाक्य आहे आपले काम पारदर्शक गतिमान व जावदायित्वाचे  कामकाज करत राहणे हीच खऱ्या अर्थाने आपली लोकांशी असलेली बांधीलकी आहे ही सांभाळली असता माहितीच्या अधिकाराचे भय बाळगण्याची गरज नाही एकूणच सर्व माहिती पुरवण्याबाबतच्या कलमांचा वापर राऊत यांनी याप्रसंगीच्या व्याख्यानात केला हा कायदा अपहार झालेल्या रकमा उघडकीस आणण्यासाठी जसा आहे तसा जनतेच्या अडल्या नाडलेल्या प्रश्नांच्या साठी उपयुक्त आहे हा कायदा प्रश्न विचारण्यासाठी नाही संघटना पदाधिकारी यांच्या नावाने अर्ज या कायद्याने करता येत नाहीत उलट मूलभूत नागरिकांना प्राप्त झालेला हा मौलिक अधिकार आहे जीने का अधिकार जानने का अधिकार हमारा पैसा हमारा हिसाब आवर मनी आवर अकाउंट हम जायेंगे हम  जिएंगे या घोषणा नाहीत तर भारतीय नागरिकांना आपल्या मानवी हक्काच्या मुक्तीसाठी मिळालेल्या स्वातंत्र्याच्या त्या घोषणा आहेत त्या गरिबी निर्मूलन व जनसामान्यांचे सक्षमीकरण या कायद्याद्वारे करता येते आणि म्हणून हा कायदा केवळ कागद देणे घेणे कायदा नाही तर समानतेचे तत्व कायद्याचे तत्व नियमांचे पालन काटेकडून झाले किंवा नाही हे तपासण्याचा अधिकार नागरिकांना यातून प्राप्त झाला आहे हे शासन प्रतिनिधींनी विसरता कामा नये

माहितीचा अधिकार कायदा हा त्रास देण्यासाठी नाही भीती बाळगण्यासाठी नाही एकमेकाचा छळ करण्यासाठी नाही तर गतिमान व जाबादायित्व गतिमान व जाबदायित्व आपल्या शासकीय कारभारात आहे हे दाखवून देणारा हा कायदा आहे हे या कायद्याचे प्रधान सूत्र आहे हे समजावून घेऊन आपले शासकीय कामकाज करावे आपण लोकांचे बांधिल आहोत आपण 
आपल्या हेतू लोकांची कामे हा आ सला पाहिजे. आपल्या गौरवशाली भारत देशाचा इतिहास विसरता कामा नये आपण लोकांचे सेवक आहोत नेत्यांचे नाही ठेकेदारांचे नाही हेही विसरता कामा नये असेही राऊत यांनी शेवटी सांगितले

अध्यक्षीय भाषणात मुख्य अधिकारी शंकरराव खंदारे म्हणाले की आपण नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करतोय हे न विसरता सतत जनहित डोळ्यापुढे ठेवून माहितीचा अधिकार वापरावा त्याचे अर्ज निरगत करावे भीती बाळगू नये हा कायदा त्रास देण्यासाठी बाहेरच्या व्यक्तींना अर्ज करावयास सांगू नये इतके एकात्मता कर्मचाऱ्यांनी पाळण्याची गरज आहे आपण सेवक आहोत आपण पदाचे मालक नाही लोक आहेत म्हणून आपण आहोत हे न विसरता कराड नगर परिषदेमधील सर्व कर्मचारी या कार्यशाळेचा लाभ घेऊन आपले सर्व अभिलेख सूचीबद्ध ठेवतील अपप्रवृत्तीच्या अर्जांचे निर्गतीकरण करतील त्याचे भय बाळगणार नाहीत असेही मुख्याधिकारी खंदारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेवटी कथन केले

अभियांत्रिक विभागाचे अर्थातच बांधकाम विभागाचे गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व व्याख्यात्यांची ओळख करून दिले या निमित्ताने कराड नगर परिषदेच्या ग्रंथालयाला राऊत यांनी एकात्मिक शिक्षण हे पुस्तक भेट दिले व सहभागी कर्मचाऱ्यांना भाषा विचार शिक्षण हे भाषा विषयावरील आधारित विचार चिकित्सा कशी करावी हे विश्लेषण करणारे पुस्तक कर्मचाऱ्यांना प्रातीनिधी क पाच जणांना भेट देण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील कराड नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या साठी प्रथमच माहितीच्या अधिकाराची कार्यशाळा व्याख्यान चे  विवरण व तसेच प्रश्न उत्तरे शंका समाधान या स्वरूपामध्ये हे व्याख्यान पार पडले या मौलिक व्याख्यानाबद्दल कर्मचाऱ्यांच्या मध्ये समाधान व्यक्त होत होते.