single-post

;कोरेगावच्या राजकारणातील दमदार चेहरा : संजय पिसाळ पुन्हा नगराध्यक्षपदाच्या रिंगणात नगराध्यक्षपदासाठी संजय पिसाळ यांच्या नावाची जोरदार चर्चा!

सामान्यांच्या सुखा-दुःखातील सोबती; संजय पिसाळ यांच्या उमेदवारीची शहरात चर्चा.गतवेळचा 'संयम' आता 'निर्धारात' बदलला; आमदार शशिकांत शिंदेंचे विश्वासू पिसाळ पुन्हा रिंगणात?

13 May, 2026

कोरेगाव जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा::

कोरेगाव शहराच्या राजकारणात आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केलेले माजी उपनगराध्यक्ष आणि माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय पिसाळ यांनी आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी शहरात सुरू केलेल्या भेटीगाठी आणि सक्रियतेमुळे ते पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगू लागली असून, यामुळे कोरेगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

​युवाशक्ती आणि दांडगा जनसंपर्क हीच जमेची बाजू

​संजय पिसाळ यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून नसून, 'कामाचा माणूस' म्हणून जनमानसात आहे. पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी शहर आणि ग्रामीण भागात मोठे जाळे विणले आहे. त्यांच्याकडे असलेल्या असंख्य युवकांचा छुपा पाठींबा आहे  युवकांच्या फौजेमुळे त्यांचे संघटन कौशल्य विरोधकांसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरले आहे. केवळ कोरेगावच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात असलेल्या त्यांच्या मित्रपरिवारामुळे त्यांचे नेटवर्क अतिशय भक्कम मानले जाते.

​'संकटमोचक' म्हणून नागरिकांची पसंती

​लग्नसमारंभ असो किंवा सुख-दुःखाचा प्रसंग, संजय पिसाळ यांची उपस्थिती नागरिकांसाठी आश्वासक असते. पोलीस स्टेशनमधील छोटे-मोठे वाद मिटवणे असो किंवा एखाद्या गरजूला तात्काळ गॅस सिलेंडर मिळवून देणे, सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे.

​निवडणुकीची आगळीवेगळी शैली

​संजय पिसाळ यांच्या विजयाचे गणित नेहमीच चर्चेत असते. ज्या प्रभागातून त्यांनी निवडणूक लढवली, तिथे त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ते कोणाचेही लटांबर न घेता एकटेच मतदारांच्या भेटीला जातात आणि तरीही निकालाच्या दिवशी निर्विवाद वर्चस्व गाजवतात, हे त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य मानले जाते.

​गतवेळची माघार आणि आताचा निर्धार

​मागील निवडणुकीत संजय पिसाळ हे नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, आमदार शशिकांत शिंदे यांच्या शब्दाखातर आणि कोरेगावच्या तत्कालीन 'बर्गे यांच्या'  विनंती ला मान देऊन ते स्वतः थांबले होते, त्यावेळी त्यांना शब्द देण्यात आला होता, एक वर्षानंतर तुम्हाला संधी देण्यात येईल परंतु नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळण्यात आला नाही, कोरेगाव शहरातील तमाम कार्यकर्त्यांनी या वेळेला चंग बांधला आहे. गेल्या वेळेची राहिलेली कसर यावेळी नक्की भरून काढायची आणि संजय पिसाळ यांना नगराध्यक्ष करायचे असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.. त्यावेळची समर्थकांमध्ये असलेली नाराजी यावेळी मोठ्या ऊर्जेत बदललेली दिसत आहे. लोकहिताच्या मुद्द्यांसाठी आणि शहराच्या प्रलंबित विकासासाठी यावेळी ते पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून खात्रीशीरपणे सांगितले जात आहे.

​सर्वसमावेशक नेतृत्व आणि 'हिंदुत्ववादी' चेहरा

​कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे समर्थक असतानाही, संजय पिसाळ यांनी सर्व समाजघटकांना सोबत घेण्याचे कसब साधले आहे. कोरेगाव यात्रेतील त्यांचा सक्रिय सहभाग आणि युवकांसाठी आयोजित स्पर्धा यामुळे ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. विशेष म्हणजे, मुस्लिम समाजातूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

​आगामी काळात होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत संजय पिसाळ यांची भूमिका निर्णायक ठरणार असून, कोरेगावच्या राजकारणाचे केंद्रबिंदू तेच राहतील, अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.