सातारा पुन्हा एकदा 'पॉवर' सेंटर; शरद पवारांच्या आगमनाने जिल्ह्यात राजकीय चैतन्य
आ. शशिकांतजी शिंदें यांच्या कामगिरीचे कौतुक पवारांच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचे लक्ष."सातारा जिल्ह्याला पुन्हा मिळणार नवी उभारी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विजयानंतर शरद पवारांचा दोन दिवसीय धावता दौरा."
08 May, 2026
सातारा | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे आज शुक्रवारी, दि. ८ मे २०२६ रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत असून, स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.इज दुपारी ३ वाजता साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे शरदचंद्रजी पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
"वस्तादाने पुन्हा शड्डू ठोकला!"
"वस्तादाने पुन्हा शड्डू ठोकलाय," अशा घोषणांनी आज परिसरात कार्यकर्ते दणाणून सोडणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांचे प्रथमच सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर जिल्ह्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी पवारसाहेब स्वतः मैदानात उतरल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्यामुळे पक्षाला पुन्हा एकदा उभारी मिळेल, असा विश्वास निष्ठावान कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
संघटन बांधणीवर मुख्य भर
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार या दोन दिवसीय दौऱ्यात जिल्ह्यातील पक्षबांधणीचा सविस्तर आढावा घेणार आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अभुतपुर्व यशामुळे शरदचंद्रजी पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांचेही अभिनंदन करतील अप्रतिम अशी कामगिरी आ.शशिकातजी शिंदे यांनी करून दाखवली आहे.सातारा तसेच संख्याबळ असताना सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करता आली नाही यावेळी शरदचंद्रजी पवार पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य करतील अशी चर्चा सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे. याला कार्यकर्त्याला काही महत्त्वाच्या सूचना मार्गदर्शन शरदचंद्रजी पवार करतील.
या सर्व विषयावरून तसेच महत्त्वाच्या बैठका: शशिकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी पवारसाहेब थेट संवाद साधणार आहेत.
राजकीय समीकरणे: ८ आणि ९ मे दरम्यान होणाऱ्या बैठकांमध्ये जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांची रणनीती ठरण्याची शक्यता आहे.
"साहेबांच्या साताऱ्यातील येण्याने केवळ कार्यकर्त्यांना बळ मिळणार असून आगामी होऊ घातलेल्या निवडणुका त्या कशा असतील काय केले पाहिजे यावर ते मार्गदर्शन करतील,, जिल्ह्यातील राजकीय दिशा देखील स्पष्ट होईल."
— पक्षाचे स्थानिक पदाधिकारी
पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष
या दौऱ्यात शरद पवार एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती आणि राज्यातील घडामोडींवर ते काय भाष्य करतात, याकडे केवळ राजकीय निरीक्षकांचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आह, शरद पवारांच्या या 'एंट्री'मुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांच्या गोटातही आता हालचालींना वेग आला आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!