single-post

​कोरेगावच्या फिटनेस क्षेत्रात नव्या पर्वाचा प्रारंभ; 'जरंडेश्वर फिटनेस'चे भव्य उद्घाटन आणि 'सातारा श्री २०२६' चा थरार!

आ. महेशदादा शिंदे व आ. मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते होणार 'श्रीगणेशा'. ;कोरेगावच्या क्रीडा वैभवात भर; 'जरंडेश्वर'च्या रूपाने अत्याधुनिक जिम सज्ज;.कोरेगावच्या क्रीडा वैभवात भर

09 May, 2026

कोरेगाव : जरंडेश्वर समाचार वृत्तसेवा:

कोरेगाव तालुक्यातील युवकांसाठी आरोग्य, फिटनेस आणि शरीरसौष्ठव क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार्या 'जरंडेश्वर फिटनेस' या अत्याधुनिक जिमचे भव्य उद्घाटन आणि " प्रतिष्ठेच्या 'सातारा श्री २०२६' शरीरसौष्ठव स्पर्धेचे "आयोजन रविवार, दि. १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. तडवळे रोडवरील सत्संग भवन शेजारील कुमठे येथे हा सोहळा पार पडणार असून, या निमित्ताने परिसरात क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाला उधाण आले आहे.

​आधुनिक सुविधांचे नवे केंद्र

​सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने आयोजित या उपक्रमामुळे कोरेगाव परिसरातील युवकांना आता जागतिक दर्जाची व्यायाम उपकरणे आणि प्रशिक्षणाची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील शरीरसौष्ठव खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील कौशल्याला वाव मिळावा, या उद्देशाने 'सातारा श्री' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडू आपला कस लावणार आहेत.

​दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

​या जिमचे उद्घाटन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. महेशदादा शिंदे आणि कराड उत्तरचे आ. मनोजदादा घोरपडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामविकास मंत्री आ. जयकुमार गोरे आणि टायगर ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. तानाजीभाऊ जाधव उपस्थित राहणार आहेत.

​राजकीय व सामाजिक नेतृत्वाचा सहभाग

​या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, सातारा जिल्हा बँक संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुलदादा बर्गे, जिल्हा परिषद सदस्य हणमंत जगदाळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष (आवा) जाधव, माजी जि.प. अध्यक्ष किरण (नाना) वर्गे आणि माजी मार्केट कमिटी सदस्य विलासराव वर्गे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

​तसेच, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अरुणाताई बर्गे, 'दि मॉडर्न'चे अध्यक्ष किशोर बाचल, नगराध्यक्षा दिपाली महेश वर्गे, पंचायत समिती सदस्य सुरेखाताई पाटील, अजिंक्य कदम, समाजसेविका सुनिताताई भोसले, शिवसेना महिला आघाडी उपाध्यक्षा रत्नमाला कदम आणि युवा उद्योजक राजू भोसले यांची विशेष उपस्थिती असेल.

​याव्यतिरिक्त उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक सुनील दादा वर्गे, सचिनभैय्या वर्गे, अजितआण्णा वर्गे, संतोष वर्गे, जयवंत पवार, निलेश पवार (उपाध्यक्ष, शिवसेना कोरेगाव) आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवणार आहेत.

​सामाजिक संघटनांचा भक्कम पाठिंबा

​या भव्य आयोजनासाठी रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील दादा मोझर, टायगर ग्रुपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शैलेशबाबा जाधव, शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेतभाऊ घुले, सरकार ग्रुपचे चंदनभाऊ शिंदे, पं. स. सभापती विक्रांत भैय्या डोंगरे, सरपंच सोमभाऊ चव्हाण, दादाश्री ग्रुपचे सागरभाऊ शिंदे, ताजे प्रतिष्ठानचे संतोष दादा घाडगे आणि आरपीआय जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

​तसेच खुशालदास गोविंदास शहा परिवार, पीएसआय वसंत शिर्के, डॉ. नितीन जाधव, युवराज बर्गे (आप्पा), राज जगदाळे व मोनिका जगदाळे यांनीही या उपक्रमासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

​"जरंडेश्वर फिटनेसच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील तरुणाईला व्यसनांपासून दूर नेऊन एका सुदृढ आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळवण्याचा आयोजकांचा मानस आहे. या जिममुळे ग्रामीण भागातील शरीरसौष्ठवपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व व्यासपीठ मिळेल‌ असा आशावाद जरंडेश्वर फिटनेसचे प्रोप्रा राज जगदाळे यांनी आपले मतं व्यक्त केले आहे.