single-post

१२वीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ८९.७९% – मुलींनी पुन्हा मारली बाजी

कोकण विभाग अव्वल, लातूर सर्वात कमी; विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

02 May, 2026

पुणे, दि. २ मे २०२६ : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी (HSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी यंदा एकूण चांगली कामगिरी करत समाधानकारक यश मिळवले आहे.

या परीक्षेस राज्यभरातून १४,४४,७१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विद्यार्थी परीक्षेला बसले, तर १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

????‍???? मुलींची पुन्हा आघाडी

यंदाही निकालात मुलींनी आपली सरशी कायम राखली आहे.

मुलींचा निकाल: ९३.१५%

मुलांचा निकाल: ८६.८०%

मुली मुलांपेक्षा तब्बल ६.३५ टक्क्यांनी पुढे राहिल्या आहेत.

???? विभागनिहाय चित्र

राज्यातील विविध विभागांमध्ये निकालात मोठी तफावत दिसून आली.

कोकण विभाग: ९४.१४% (राज्यात अव्वल)

लातूर विभाग: ८४.१४% (सर्वात कमी)

???? शाखानिहाय निकाल

शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने बाजी मारली आहे.

विज्ञान: ९६.४४% (सर्वाधिक)

वाणिज्य: ८७.०३%

कला: ७८.०२%

व्यावसायिक अभ्यासक्रम: ८२.७४%

⭐ इतर ठळक बाबी

१५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १००%

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९०.५८%

मागील वर्षाच्या तुलनेत निकालात २.०९% घट

???? परीक्षा पारदर्शकतेसाठी उपाय

यंदा परीक्षा कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात घेण्यासाठी मंडळाने विशेष उपाययोजना केल्या होत्या:

सर्व केंद्रांवर CCTV देखरेख

केंद्रांच्या ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद

राज्यभर कॉपीमुक्त अभियान

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व हेल्पलाईन सुविधा

गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुढील तीन परीक्षांमध्ये संधी उपलब्ध राहणार आहे.

???? मंडळाचे आवाहन

मंडळाकडून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुरवणी परीक्षेद्वारे यश मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.