विद्यार्थ्यांसाठी दिलासा : १२ वी (HSC) निकाल आज दुपारी १ वाजता; मोफत समुपदेशन सेवा उपलब्ध
आज दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर विद्यार्थ्यांच्या तणावावर मात करण्यासाठी मंडळाची पुढाकार ८ दिवस मोफत समुपदेशन सेवा उपलब्ध सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संपर्क सुविधा १० अनुभवी समुपदेशकांची नियुक्ती विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शनाची सुवर्णसंधी
02 May, 2026
विद्यार्थ्यांसाठी दिलासा : १२ वी (HSC) निकाल आज दुपारी १ वाजता; मोफत समुपदेशन सेवा उपलब्ध
पुणे : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता संपणार असून इयत्ता १२ वी (HSC) परीक्षेचा निकाल आज, शनिवार (दि. २ मे २०२६) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. निकालानंतर निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी मानसिक घालमेल, तणाव व पुढील शैक्षणिक वाटचालीबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी मंडळाने १० अनुभवी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.
८ दिवस मोफत समुपदेशन सेवा
ही समुपदेशन सेवा निकालाच्या दिवसापासून पुढील ८ दिवस सुरू राहणार असून दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थी व पालकांना समुपदेशकांशी संपर्क साधता येणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा पूर्णपणे निशुल्क (मोफत) ठेवण्यात आली आहे.
समुपदेशकांचे संपर्क क्रमांक :
९९६०६४४४११
७९७२५७३७४२
९८३४०८४५९३
९३५९९७८३१५
८१६९२०२२१४
९३७१६६१२५५
७२०८४२९३८१
७७०९१५६०६८
८४२११५०५२८
९४०४७८३९९६
निकालानंतर विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा तणाव न घेता या सेवेचा लाभ घ्यावा, तसेच पालकांनीही मुलांना मानसिक आधार देत योग्य मार्गदर्शनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!