प्रशासनाच्या दिरंगाईवरून 'देसाई' आक्रमक; 'हलगर्जीपणा खपवून घेणार नाही', सीईओंनीही सुनावले
प्रशासनाच्या दिरंगाईवरून 'देसाई' आक्रमक; 'हलगर्जीपणा खपवून घेणार नाही', सीईओंनीही सुनावले
30 April, 2026
सातारा | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:
माण तालुक्यातील भीषण पाणीटंचाईच्या प्रश्नावर आयोजित आढावा बैठकीत शुक्रवारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमनेसामने आल्याने मोठे वादळ निर्माण झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) याशनी नागराजन आणि जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली. टँकरचे ढिसाळ नियोजन आणि कामांमधील कमालीची दिरंगाई यावरून लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरल्याने बैठकीचा पारा चांगलाच चढला होता. माण तालुक्यात अगोदरच तपमानची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ही खडाजंगी मुळे आणखीच तपमानात चांगलीच वाढ वाढल्याचे जनतेला पाहायला मिळाले .
माण तालुक्यात सध्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, बैठकीच्या सुरुवातीलाच टँकर व्यवस्थापन, विहीर अधिग्रहण आणि जलसंधारणाच्या रखडलेल्या कामांवरून सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने वातावरण चांगलेच तापले. यावेळी देसाई आणि सीईओ नागराजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. सदस्यांनी प्रशासकीय निष्क्रियतेचा आरोप करत संताप व्यक्त केल्याने बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला होता.
बैठकीत 'हाय व्होल्टेज' ड्रामा!
लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्यानंतर सीईओ याशनी नागराजन यांनीही आक्रमक भूमिका घेतली. "पाणीटंचाई हा लोकांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न आहे, यात राजकारण नको. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही," अशा शब्दांत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे कान टोचले. प्रशासकीय शिस्त आणि जनतेचे प्रश्न यावरून दोन्ही बाजूंकडून झालेल्या युक्तिवादाने बैठकीत 'हाय व्होल्टेज' ड्रामा पाहायला मिळाला. तर मुख्य अधिकारी याशनी नागराजन यांनी या बैठकीतून पळ काढला अशी चर्चा दिवसभर सुरू होती, व्यसनी नागराजन यांनी मिटींग असल्यामुळे त्या निघून गेले असल्याचे स्पष्ट केले
तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश
वातावरण निवळल्यानंतर टँकर पुरवठा सुरळीत करणे, खासगी विहिरींचे तातडीने अधिग्रहण आणि जलसंधारणाच्या कामांना गती देण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले. प्रत्येक गावाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश सीईओंनी दिले आहेत.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील या संघर्षावरून माणमधील पाणीप्रश्न किती पेटला आहे, हे स्पष्ट झाले असून आता प्रत्यक्षात टँकर कधी धावणार, याकडे तहानलेल्या माणदेशाचे लक्ष लागले आहे. पाणी टँकरच्या बाबत वितरणामध्ये जर पक्षपातीपणा झाल्यास जिल्हा परिषदवर मोर्चा काढला जाईल असे असे एका नागरिकांनी सांगितले, यावर स्पष्ट होते की मान मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे यामध्ये प्रशासन आणि पॉलिटिकल लीडर यांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण आणू नये असं सामान्य जनतेचे मत आहे पाहूया काय होते ते..!

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!