single-post

कोरेगावात हिवताप प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम; प्रभातफेरीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

​"तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर गांधिले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावात आरोग्यदूत उतरले रस्त्यावर"

25 April, 2026

कोरेगावात हिवताप प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम; प्रभातफेरीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

​कोरेगाव: जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-

हिवताप प्रतिबंध महिन्याचे औचित्य साधून कोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तडवळे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत काढण्यात आलेल्या प्रभातफेरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, याद्वारे हिवताप आणि डेंग्यू प्रतिबंधाबाबत व्यापक जनजगृती करण्यात आली.

​कोरेगाव पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर गांधिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. विवेक सोनमणकर यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम पार पडला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

​उपक्रमाचे स्वरूप आणि मार्गदर्शन

​या मोहिमेदरम्यान केवळ प्रभातफेरीच काढली नाही, तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन कंटेनर सर्वेक्षण केले. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती कशी रोखायची, याबाबत नागरिकांना प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.

​प्रमुख उपस्थिती: या उपक्रमात उपनगराध्यक्ष राहुलदादा बर्गे, नगरसेवक सुनीलदादा बर्गे,  व संजीवनी बर्गे यांनी सहभाग घेऊन मोहिमेला बळ दिले.

​आरोग्य पथक: तालुका आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल ओंबाळे, विठ्ठल गुजर, आरोग्य सहाय्यक चौगुले व कदम यांच्यासह तडवळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी या मोहिमेत सक्रिय होते.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल ओंबाळे यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. "आपला परिसर कोरडा ठेवणे हीच हिवताप आणि डेंग्यूपासून बचावाची पहिली पायरी आहे," असे आवाहन यावेळी करण्यात आले.

"हिवताप आणि डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी दर रविवारी 'कोरडा दिवस' पाळावा आणि कुठेही पाणी साचू देऊ नये."