कोरेगावचा बालेकिल्ला: भाजपला रोखण्यासाठी नवा वाघ येतोय..!
अजितदादांच्या निधनानंतर जिल्ह्याला खंबीर नेतृत्वाची ओढ; सातारकरांची शिंदेंना पसंती! साताऱ्याच्या राजकीय क्षितिजावर 'एकनाथी' पर्व; बहुजन चेहरा ठरतोय आकर्षणाचे केंद्र. पोरक्या झालेल्या कार्यकर्त्यांना हक्काचा आधार; मुख्यमंत्री शिंदेंच्या रुपाने साताऱ्याला
21 April, 2026
कोरेगावचा बालेकिल्ला: भाजपला रोखण्यासाठी नवा वाघ येतोय..!
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता, येथील मतदारांनी भाजपला कधीही मनापासून स्वीकारलेले नाही. स्थानिक पातळीवर भाजपच्या रणनीतीबद्दल प्रचंड नाराजी असून, केवळ मजबुरीपोटी काही नेते तिथे असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. , शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यावर मतदारसंघातील कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात असून त्यातच त्यांचे निकट वरती या कट्टर कार्यकर्ते राजाभाऊ परगे प्रथम नगराध्यक्ष कोरेगाव यांचा नुकताच प्रवेश झाला असल्यामुळे आमदार महेश शिंदे वर बरेच कार्यकर्ते नाराज आहेत, काही कार्यकर्ते नाराजी उघड करतायेत तर काही नाराजी लपवून ठेवत आहेत ,आगामी काळात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता..! वर्तवली जात आहे,. कोरेगावमध्ये भाजपची डाळ शिजणे कठीण असून, शिवसेनेच्या 'धनुष्यबाणा'चा जोर या भागात सर्वाधिक आहे.
-सुरेश बोतालजी संपादक,सातारा
क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या राजकारणात सध्या ऐतिहासिक वळण पाहायला मिळत आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानला जाणारा हा जिल्हा आता एका मोठ्या नेतृत्वाच्या शोधात होता. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवरील प्रेम कायम असले, तरी वयोमानामुळे त्यांचा जिल्ह्याशी असलेला मर्यादित संपर्क आणि त्यातच अजितदादा पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली मोठी पोकळी, यामुळे साताऱ्याचे राजकारण खऱ्या अर्थाने पोरके झाले होते. ही पोकळी भरून काढण्यासाठी आता जिल्ह्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या 'बहुजन' नेतृत्वाला पसंती दिली आहे.
अजितदादांनंतर साताऱ्याचे नेतृत्व 'शिंदे' पेलणार?
सातारा जिल्ह्यावर अजितदादा पवार यांचे विशेष लक्ष असायचे. त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठे वैफल्य आले होते. 'नेता अभावी सैन्य सैरभैर' अशी अवस्था झालेल्या कार्यकर्त्यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एक सक्षम आणि आश्वासक चेहरा मिळाला आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः शेतकरी कुटुंबातील आणि बहुजन समाजाचे नेते असल्याने साताऱ्यातील जनतेला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटत आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या या जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षात होणारे मोठ्या प्रमाणावरील प्रवेश हे साताऱ्याच्या बदलत्या राजकारणाचे संकेत आहेत.
राजघराणी आणि वैयक्तिक ताकदीचे महत्त्व
साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन राजघराण्यांची वैयक्तिक ताकद आजही अबाधित आहे. शिवेंद्रसिंहराजे कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊ शकतात, इतका त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तसेच फलटणमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रभाव आजही कायम आहे. मात्र, पक्षीय राजकारणात आता साताऱ्याच्या गांधी मैदानातील ऐतिहासिक सभेनंतर गणिते पूर्णपणे बदलली आहेत.
तरुणाईचा 'जय भवानी'चा नारा आणि महायुतीचे भवितव्य
जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव ओसरत चालला असून पृथ्वीराज चव्हाण यांचा संपर्क कमी झाल्याची टीका होत आहे. अशा परिस्थितीत साताऱ्याचा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आकर्षित झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जर शंभूराजे देसाई, मकरंद पाटील, नितीन पाटील आणि शशिकांत शिंदे यांची स्थानिक पातळीवर युती झाली, तर भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहील. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने कोरेगाव पंचायत समितीवर झेंडा फडकवून आपली ताकद दाखवून दिलीच आहे.
सातारकर कोणाच्या दबावाला बळी पडणार नाहीत!
सातारा जिल्हा हा स्वाभिमानी लोकांचा जिल्हा आहे. ईडी किंवा इतर कोणत्याही राजकीय दबावाला येथील जनता कधीही भीक घालत नाही,अशी चर्चा सातारा येथील जनता करीत असून हे इतिहासाने वेळोवेळी सिद्ध केले आहे. भाजपच्या चाली सातारकरांच्या लक्षात येत असून, येणाऱ्या काळात कोरेगावसह संपूर्ण जिल्ह्यात भाजपला पराभवाचा झटका बसल्यास आश्चर्य वाटू नये असं सातारा जिल्ह्यातील लोक चर्चा करीत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने साताऱ्याला जो 'हक्काचा सुपुत्र' मिळाला आहे, त्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास आणि राजकारण आता एका नव्या उंचीवर घेऊन जाईल, हे निश्चित!

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!