कोरेगावचा धुरळा उडणार ! 'हिंदकेसरी' बैलगाडा स्पर्धेचे काउंटडाऊन सुरू; कोण होणार यंदाचा मानकरी? थरार! ८२ व्या ‘हिंदकेसरी’ बैलगाडा आखाड्याचा बिगुल वाजला!
१४ फुटी 'स्मार्ट' ट्रॅक सज्ज; ८२ व्या वर्षानिमित्त पारितोषिकांचा पाऊस, २० एप्रिलला होणार पारदर्शक सोडत.
19 April, 2026
कोरेगावचा थरार! ८२ व्या ‘हिंदकेसरी’ बैलगाडा आखाड्याचा बिगुल वाजला; बक्षिसांचा पाऊस आणि शिस्तीचा दरारा!
कोरेगाव | सुरेश बोतालजी संपादक( जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा) :
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल रांगडा खेळ आणि ग्रामीण संस्कृतीची शान असलेला कोरेगावचा ऐतिहासिक बैलगाडा आखाडा यंदा आपल्या ८२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित ही 'हिंदकेसरी' स्पर्धा २१ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडणार असून, यंदा विक्रमी बक्षिसे आणि हायटेक नियोजनामुळे या मैदानाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
बक्षिसांची लयलूट: ८२ व्या वर्षाचे खास आकर्षण
यंदाच्या ८२ व्या वर्षाचे औचित्य साधून आयोजकांनी बक्षिसांचा आकडाही लक्षवेधी ठेवला आहे. एकूण ९ क्रमांकांना भरघोस रोख पारितोषिके दिली जाणार आहेत:
- प्रथम क्रमांक: ₹१,८२,००० (एक लाख ८२ हजार रुपये)
- नववा क्रमांक: ₹१५,०८२
- विशेष: शिस्तबद्ध धावणाऱ्या आणि नियमांचे पालन करणाऱ्या गाड्यांवर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.
- आयोजकांनी विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा केली असून, पहिल्या नऊ क्रमांकांसाठी विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व विजेत्यांना यात्रा कमिटीतर्फे मानाच्या ढाली देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकः १.०१.०८२/- के. संभाजीराव सर्जेराव बर्गे यांच्या स्मरणार्थ श्री. किरण संभाजीराव बर्गे यांचेतर्फे, द्वितीय क्रमांक ८१.०८२/- श्री. प्रशांत उर्फ
- राजाभाऊ फत्तेसिंह बर्गे यांचेतर्फे, तृतीय क्रमांकः ६१,०८२/- कै. सौ. आशातला लक्ष्मण वर्ग यांच्या स्मरणार्थ श्री. दिनेश लक्ष्मण बर्गे यांचेतर्फे, चतुर्य क्रमांकः ५१,०८२/- कै. विश्वासराव बजरंग बर्गे यांच्या स्मरणार्थी अॅड. प्रभाकर विश्वासराव बर्गे यांचेतर्फे, पंचम क्रमांकः ४१,०८२/- श्री. योगेश आनंदराव बर्गे हॉटेल कंट्री इन व हॉटेल महिंद्रा एक्झिक्यूटिव्ह सातारा यांचेतर्फे, सहावा क्रमांकः ३१,०८२/- श्री. विकास शहाजीराव बर्गे मित्र मंडळ व चिठ्ठी ग्रुप कोरेगाव यांचेतर्फे, सातवा क्रमांकः २१,०८२/- कै. रवींद्र बाबासो बर्गे यांच्या स्मरणार्थ श्री राहुल पुरुषोत्तम बर्गे यांचेतर्फे, आठवा क्रमांकः १७,०८२/- श्री. सतीश हणमंतराव बर्गे यांचेतर्फे, नववा क्रमांकः १५,०८२/- कै. शिवाजी बाबुराव सुतार यांच्या स्मरणार्थ श्री. बबन शिवाजी सुतार यांचेतर्फे
- प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण: मोठ्या गर्दीची अपेक्षा-या शर्यती पाहण्यासाठी दरवर्षी हजारो प्रेक्षक उपस्थित राहतात. शर्यतींचा वेग वेलांची ताकद गाडा बालकांचे कौशल्य आणि मैदानातील उत्साह पामुळे वातावर पूर्णपणे भारलेले असते. यंदाही या सोहळ्याला विक्रमी गर्दा होण्याची शक्यता असून, शिस्तबद्ध व सुरक्षित आयोजनासाठी आयोजकांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
- आवाहन या भव्य आणि पारंपरिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तसेच बैलगाडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
'स्मार्ट' ट्रॅक आणि बैलांची सुरक्षा प्रथम!
कोरेगावच्या या मैदानाने सुरक्षेचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. बैलांना इजा होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे:
- मैदान: १४ फुटांचा सुसज्ज ट्रॅक, जो रोलिंग करून पूर्णपणे खड्डेमुक्त आणि दगडमुक्त करण्यात आला आहे.
- सुविधा: बैलांसाठी ७ पाण्याचे टँकर आणि तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका तैनात असेल.
- प्रेक्षक गॅलरी: महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र गॅलरीसह उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मोठ्या शेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
पारदर्शकता आणि नियमांचे 'कडक' बंधन
"कोरेगावचा आखाडा म्हणजे शब्दाचा पक्का आणि नियमांचा पक्का," ही ओळख यंदाही जपली जाणार आहे.
"बैलांना मारहाण करणे किंवा शेपूट चावणे यांसारखे निर्दयी प्रकार आढळल्यास थेट अपात्रतेची कारवाई केली जाईल. आमचे लक्ष केवळ स्पर्धेवर नाही, तर मुक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेवरही आहे," असा सज्जड दम आयोजकांनी दिला आहे.
गेल्यापरंपरेचा मान राखणारा झेंडा पंच
या आखाड्याचे विशेष आकर्षण म्हणजे राज्यभर प्रसिद्ध असलेले झेंडा पंच राजेंद्र बापू धनवडे, जे गेली ३२ वर्षे या मैदानात पंच म्हणून कार्यरत आहेत. “कोरेगावच्या मैदानाने दिलेली शिकवण महाराष्ट्रभर पोहोचवली,” असे त्यांनी सांगितले. ३२ वर्षांपासून या मैदानाचा मान राखणारे प्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र बापू धनवडे यंदाही आपल्या अनुभवातून स्पर्धेला न्याय देणार आहेत. यावेळी राजेंद्र धनवडे म्हणाले माझे जुने गुरु मुरली अण्णा बर्गे व संपत अण्णा बर्गे यांनी झेंडा कसा टाकायचा कोणावरही अन्याय करायचा नाही असे शिकवण दिली ती मी शिकवण महाराष्ट्रभर शिकवण दिली याचा मला अभिमान आहे या कोरेगावच्या मातीच्या भूमीतूनच या बैलगाड्यांच्या मैदानातून मी जे काय शिकलो ते महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न केला आहे .आज माझे नाव महाराष्ट्रभर चमकत आहे .ते कोरेगावच्या मैदानामुळे अशी बापू यांनी स्पष्टपणे सांगितले.
नोंदणी आणि नियोजन
- नोंदणी: १८ एप्रिलपासून सुरू झाली असून २० एप्रिल सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहील.
- सोडत (चिठ्ठ्या): २० एप्रिलला सकाळी श्री भैरवनाथ मंदिरात पत्रकार आणि यूट्यूब चॅनेलच्या उपस्थितीत अत्यंत पारदर्शकपणे 'लकी ड्रॉ' काढला जाईल.
- पार्किंग: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चारचाकी गाड्या दि.मॉडर्न हायस्कूलमध्ये, तर दुचाकी रेणुका मंदिरासमोर पार्क कराव्या लागणार आहेत.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष शहाजीराव बर्गे, उपाध्यक्ष चंद्रकांत बर्गे, सचिव गजानन बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि कोरेगावचे ग्रामस्थ अहोरात्र कष्ट घेत आहेत.
कोरेगावचा बैलगाडा आखाडा म्हणजे परंपरेचा मान, स्पर्धेचा थरार आणि ग्रामीण संस्कृतीचा जिवंत उत्सव — यंदा पुन्हा एकदा महाराष्ट्राचे लक्ष या मैदानाकडे लागले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खिल्लार शौकिनांनी या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चला तर मग, सज्ज व्हा कोरेगावच्या मैदानात 'धुरळा' उडवण्यासाठी!

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!