१९५२ पासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कोरेगावची श्रीकृष्ण बेकरी
चवीचा वारसा ७४ वर्षांचा; स्वच्छतेशी मात्र तडजोड नाही१९५२ पासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कोरेगावची श्रीकृष्ण बेकरी; टापटीपपणा, स्वच्छता आणि दर्जेदार खाद्यपदार्थांतून विश्वासाची परंपरा जपली प्रत्येक साहित्य झाकणबंद डब्यात, दररोज स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांस
25 November, 2026
चवीचा वारसा ७४ वर्षांचा; स्वच्छतेशी मात्र तडजोड नाही!
१९५२ पासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कोरेगावची श्रीकृष्ण बेकरी; टापटीपपणा, स्वच्छता आणि दर्जेदार खाद्यपदार्थांतून विश्वासाची परंपरा जपली
प्रत्येक साहित्य झाकणबंद डब्यात, दररोज स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांसाठी हेअरनेट अनिवार्य; प्रोप्रा. दिलीप वलियाविटील यांच्या श्रीकृष्ण बेकरीचा वेगळा आदर्श!
- सुरेश बोतालजी
कोरेगाव : खाद्यपदार्थांच्या व्यवसायात चव, गुणवत्ता आणि आकर्षकता यांना जितके महत्त्व आहे, तितकेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक महत्त्व स्वच्छतेला आहे. कारण ग्राहक एखादा पदार्थ विकत घेताना त्याची चव अनुभवतो; मात्र त्या पदार्थाच्या निर्मितीमागील स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षिततेची प्रक्रिया त्याला दिसत नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी स्वच्छतेला केवळ औपचारिकता न मानता ती व्यवसायसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनवणे आवश्यक आहे. कोरेगावमधील १९५२ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेली श्रीकृष्ण बेकरी या दृष्टीने विशेष लक्ष वेधून घेते. तब्बल ७४ वर्षांचा व्यावसायिक वारसा जपत प्रोप्रा. दिलीप वलियाविटील श्रीकृष्ण बेकरीने चव, टापटीपपणा आणि स्वच्छतेला महत्त्व दिल्याची ओळख निर्माण केली आहे.
अर्धा चमचाभर धूळही दिसणार नाही, इतकी स्वच्छता!
श्रीकृष्ण बेकरीचे सर्वांत उठून दिसणारे वैशिष्ट्य म्हणजे तेथील स्वच्छता. बेकरीचा परिसर, पदार्थ तयार करण्याची जागा, साहित्य ठेवण्याची व्यवस्था आणि कामकाजाची ठिकाणे अत्यंत स्वच्छ व नीटनेटकी ठेवण्यावर भर दिला जातो. येथे स्वच्छतेची काळजी इतक्या बारकाईने घेतली जाते की, अर्धा चमचाभर धूळही दिसणार नाही, अशी टापटीप राखली जाते.
दररोज नियमितपणे स्वच्छता केली जाते. बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे पीठ, साखर, मसाले आणि इतर आवश्यक साहित्य स्वतंत्र झाकणबंद डब्यांमध्ये ठेवले जाते. प्रत्येक साहित्याची साठवणूक व्यवस्थित आणि सुरक्षित पद्धतीने केली जाते. उघड्यावर साहित्य ठेवण्याऐवजी झाकणबंद डब्यांचा वापर केल्यामुळे धूळ, बाहेरील कण आणि इतर अनावश्यक घटकांपासून त्याचे संरक्षण होते .
कामगारांसाठी हेअरनेट अनिवार्य!
बेकरीतील स्वच्छतेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता. पदार्थ तयार करण्याच्या कामात सहभागी असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला डोक्यावर हेअरनेट म्हणजेच केस झाकणारे जाळीदार संरक्षक आवरण घालणे अनिवार्य आहे. अन्नपदार्थ तयार करताना केस किंवा इतर बाह्य घटक पदार्थांमध्ये जाण्याची शक्यता टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जाते.
अन्नपदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेत स्वच्छता राखणे, साहित्य योग्य पद्धतीने साठवणे आणि कामाच्या जागेची नियमित देखभाल करणे या बाबींची एकत्रित अंमलबजावणी म्हणजेच अन्नसुरक्षेच्या दृष्टीने जबाबदार व्यावसायिक दृष्टिकोन होय. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून अशा सवयी प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेत्याने अंगीकारणे आवश्यक आहे.
खारीपासून कस्टमाइज्ड केकपर्यंत खाद्यपदार्थांची विविधता
१९५२ मध्ये सुरू झालेल्या श्रीकृष्ण बेकरीने बदलत्या काळानुसार आपल्या उत्पादनांमध्ये विविधता आणली आहे. ब्रेड, पाव, खारी, टोस्ट, बटर बिस्किटे, मसाला बटर, नानकटाई, चोकोचिप कुकीज, काजू-किशमिश कुकीज, नट क्रंची अशा पारंपरिक आणि आधुनिक बेकरी उत्पादनांची येथे उपलब्धता आहे.
याशिवाय विविध प्रकारचे केक, पेस्ट्री, प्लम केक, गुलाबजाम केक आणि ग्राहकांच्या आवडीनुसार तयार केले जाणारे कस्टमाइज्ड केक यांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. वाढदिवस, विवाहवर्धापनदिन, साखरपुडा, लग्नसमारंभ आणि इतर कौटुंबिक सोहळ्यांसाठी आकर्षक केक तयार करण्याची संकल्पना आज लोकप्रिय झाली आहे.
बेकरी उत्पादनांबरोबरच बाकरवडी, फरसाण, पेढे आणि इतर खाद्यपदार्थांची उपलब्धता ग्राहकांना विविध पर्याय देते. त्यामुळे पारंपरिक चवीपासून आधुनिक खाद्यसंस्कृतीपर्यंतचा अनुभव येथे घेता येतो. श्रीकृष्ण बेकरीचे अजून एक खासियत म्हणजे मेथीची खारी खूप प्रसिद्ध आणि लोकांना आवडणारे अशीही खारी आहे.
सात दशकांचा प्रवास म्हणजे ग्राहकांच्या विश्वासाची पावती!
१९५२ पासून आजपर्यंतचा प्रवास हा केवळ एका दुकानाचा इतिहास नाही, तर कोरेगाव शहराच्या बदलत्या व्यावसायिक आणि सामाजिक जीवनाचा एक भाग आहे. अनेक पिढ्यांनी या बेकरीतील पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. जुन्या पिढीच्या आठवणी आणि नव्या पिढीच्या आवडी यांचा मेळ या व्यवसायात दिसून येतो.
आज ग्राहकांच्या अपेक्षा बदलल्या आहेत. पदार्थांची चव चांगली असण्याबरोबरच त्यांचा दर्जा, स्वच्छता, सुरक्षितता, योग्य साठवणूक आणि ग्राहकसेवा या गोष्टींनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. डिजिटल पेमेंट, टेकअवे आणि होम डिलिव्हरी यांसारख्या सुविधांमुळे ग्राहकांना खरेदी अधिक सोयीस्कर झाली आहे.
कोरेगावपुरती मर्यादित न राहता सातारा जिल्ह्यातील ग्राहकांमध्येही श्रीकृष्ण बेकरीने आपली ओळख निर्माण केली आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बेकरी म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. विशेषतः स्वच्छता आणि टापटीपपणाबाबत घेतली जाणारी काळजी ही तिच्या वेगळेपणाची जमेची बाजू आहे.
स्वच्छता ही जाहिरात नव्हे, तर ग्राहकांप्रती जबाबदारी!
आज अन्नपदार्थांच्या व्यवसायात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत केवळ जाहिरात, आकर्षक सजावट किंवा कमी किमतीच्या माध्यमातून ग्राहक मिळवणे पुरेसे नाही. ग्राहकांचा दीर्घकालीन विश्वास संपादन करण्यासाठी उत्पादनांचा दर्जा आणि स्वच्छतेची शिस्त सातत्याने जपावी लागते. ती श्रीकृष्ण बेकरीने जपली आहे.
श्रीकृष्ण बेकरीमध्ये दिसणारी स्वच्छतेची कार्यपद्धती इतर बेकरी व्यावसायिकांसाठीही अनुकरणीय ठरू शकते. प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेत्याने साहित्य झाकणबंद डब्यांत ठेवणे, कामाच्या जागेची नियमित स्वच्छता करणे, कर्मचाऱ्यांना संरक्षक आवरण वापरणे बंधनकारक करणे आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे.
ग्राहकांनीही खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, ताजेपणा, उत्पादनाची तारीख आणि स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे, कारण ग्राहक हा आपला देवच आहे असे मत श्रीकृष्ण बेकरीचे सर्वेसर्वा प्रोप्रा दिलीप वेलवेट्टी यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.
चवीचा वारसा जपणारे अनेक व्यवसाय असतात; मात्र त्या चवीसोबत स्वच्छतेची शिस्त आणि ग्राहकांच्या आरोग्याची जाणीव जपणारा व्यवसाय खऱ्या अर्थाने विश्वास संपादन करतो. कोरेगावची श्रीकृष्ण बेकरी हा ७४ वर्षांचा प्रवास पुढे नेताना स्वच्छतेला दिलेले महत्त्व अधोरेखित करत आहे. परंपरेचा सुगंध, पदार्थांची विविधता आणि स्वच्छतेचा आग्रह यांचा संगम म्हणजे श्रीकृष्ण बेकरीची वेगळी ओळख!

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय