सातारा जिल्हा परिषद: स्थायी समिती सदस्य पदी कामेश कांबळे यांची निवड
लोकसंपर्क आणि दांडगा अनुभव; कामेश दादा कांबळे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी;ग्रामीण विकासाला मिळणार बळ; स्थायी समितीवर अभ्यासू नेतृत्वाची निवड. सर्वसामान्यांचा आवाज आता जिल्हा परिषदेच्या निर्णय प्रक्रियेत घुमणार!
17 April, 2026
सातारा जिल्हा परिषद: स्थायी समिती सदस्य पदी कामेश कांबळे यांची निवड
सातारा / जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती निवडीनंतर शुक्रवारी झालेली पहिली विशेष सर्वसाधारण सभा अपेक्षेप्रमाणे राजकीय घडामोडींनी गाजली. या सभेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यपदी कामेश दादा कांबळे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण असून, ग्रामीण विकासाला आता नवी गती मिळण्याची चिन्हे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही सभा केवळ औपचारिक ठरली नाही. सभेच्या सुरुवातीपासूनच सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने वातावरण कमालीचे तापले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी विविध तांत्रिक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
स्थायी समितीवर कामेशचा 'शब्द' कायम
जिल्हा परिषदेचा 'कणा' मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे नेतृत्व म्हणून कामेश दादा कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्या निवडीची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला.
"माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठ्यासाठी पारदर्शक व लोकाभिमुख काम करण्याचा माझा मानस आहे."
— कामेश दादा कांबळे (सदस्य, स्थायी समिती)
कामेश दादा कांबळे यांच्या निवडीनंतर सातारा जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. प्रशासकीय निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू असलेल्या या समितीवर त्यांच्यासारखा अभ्यासू कार्यकर्ता गेल्याने जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फुटेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!