single-post

मंगळापूर जिल्हा परिषद शाळेचा दि.१५ लि 'शताब्दी महोत्सव'; शंभर वर्षांच्या ज्ञानयज्ञाचा गौरव सोहळा

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा १०० वर्षांचा यशस्वी प्रवास!:​

14 April, 2026

मंगळापूर जिल्हा परिषद शाळेचा उद्या 'शताब्दी महोत्सव'; शंभर वर्षांच्या ज्ञानयज्ञाचा गौरव सोहळा

माजी शिक्षकांचा 'गौरवमूर्ती' सन्मान; राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती

मंगळापूर (ता. कोरेगाव) : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-

कोरेगाव तालुक्यातील शैक्षणिक वारसा जपणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंगळापूर (जि. सातारा) या शाळेने शंभर वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून बुधवार, दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रामपंचायत शेजारील पटांगणात शाळेचा 'शताब्दी महोत्सव' सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

मान्यवरांची मांदियाळी

​या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोरेगाव मतदारसंघाचे आमदार मा. महेशदादा शिंदे, विधानपरिषद सदस्य मा. शशिकांतजी शिंदे, पंचायत समिती कोरेगावच्या सभापती मा. रुपाली कदम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. अनिस नायकवडी, गट विकास अधिकारी मा. सुप्रिया चव्हाण, माजी विद्यार्थी अधीक्षक मा. विलास जावळे तसेच प्रसिद्ध लेखक व मोटिवेशनल स्पीकर मा. सचिन गोसावी उपस्थित राहणार आहेत.

​विशेष निमंत्रित म्हणून शिक्षण समिती सभापती मा. तेजस्विनी कदम, उपसभापती मा. रवींद्र पवार, शिक्षणाधिकारी (निरंतर) मा. शबनम मुजावर, गट शिक्षणाधिकारी मा. वनिता मोरे, केंद्रप्रमुख मा. विठ्ठल स्वामी, जि. प. उपाध्यक्ष मा. राजुभैय्या भोसले, सदस्य मा. हणमंतराव जगदाळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. धनंजय चोपडे, माजी प्राचार्य डॉ. एल. डी. कदम आणि सं. सचिव मा. अरुण माने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

जुना स्मृतींना उजाळा: शिक्षकांचा 'गौरवमूर्ती' सन्मान

​२६ मार्च १९२६ रोजी स्थापन झालेल्या या शाळेने आजवर अनेक पिढ्या घडवल्या आहेत. शताब्दी महोत्सवानिमित्त १९२६ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत शाळेत ज्ञानदान केलेल्या आणि सध्या हयात असलेल्या शिक्षकांचा 'गौरवमूर्ती' म्हणून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

सन्मानित होणारे शिक्षक:

अरविंद निवृत्ती घाडगे, राजाराम जगन्नाथ साळपे, तुकाराम गणपती चव्हाण, रामराव नारायण मतकर, रेखा मोहिते, विजय केंजळे, अनिता खताळ, संदीप बाबर, विद्युलता देसाई, सुरेश भोसले, दिलीप पंडित, लिलावती अडसूळ, उदय घोरपडे, निवृत्ती यादव, राजेंद्र देशमाने, वैशाली बाचल, विजया देवकर, आबासाहेब पाटोळे, बलराम माने, तानाजी माने, श्रीनिवास वेल्हाळ, तानाजी घाडगे, आनंदराव शिखरे, पृथ्वीराज निकम, उर्मिला अवसरे, कुमार उदांडे व आबासाहेब भंडारे आदींचा गौरव केला जाणार आहे.


उपस्थितीचे आवाहन

​या ऐतिहासिक सोहळ्यासाठी शाळेचे सर्व आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे गावच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला जाणार असून, संपूर्ण मंगळापूर परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.