कोरेगाव तहसील हादरले; पुरवठा अधिकारी शिंदेसह खाजगी हस्तक १.२५ लाखांची लाच घेताना जेरबंद!
एसीबीचा 'सर्जिकल स्ट्राईक': गॅस एजन्सीवरील कारवाई टाळण्यासाठी लादला होता लाचेचा तगादा; कोरेगाव तहसील हादरले; सव्वा लाखांची लाच घेताना पुरवठा अधिकारी 'फिक्स'! आवारात रंगला थरार; १.२५ लाखांची रक्कम स्वीकारताच एसीबीची झडप.२ लाखांची मागणी अन् सव्वा लाखाची त
06 April, 2026
कोरेगाव तहसील हादरले; पुरवठा अधिकारी शिंदेसह खाजगी हस्तक १.२५ लाखांची लाच घेताना जेरबंद!
एसीबीचा 'सर्जिकल स्ट्राईक': गॅस एजन्सीवरील कारवाई टाळण्यासाठी मागितली होती लाच
कोरेगाव | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-
कोरेगाव तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा उकिरडा आज पुन्हा एकदा वेशीवर टांगला गेला आहे. गॅस एजन्सीच्या गोदामाची वारंवार तपासणी न करण्यासाठी आणि तक्रारींवर पडदा टाकण्यासाठी सव्वा लाखाची लाच स्वीकारताना पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद कैलास शिंदे आणि त्याचा खाजगी हस्तक याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडले. जनसेवा बँकेच्या आवारात हा थरार घडला असून, या कारवाईमुळे महसूल विभागातील 'अर्थपूर्ण' व्यवहारांचे धिंडवडे निघाले आहेत.
गॅस एजन्सीला लावला होता 'तगादा'
यातील तक्रारदार यांची कोरेगाव येथे भारत गॅस एजन्सी आहे. सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे भांडवल करत, शासकीय नियमानुसार गॅस वितरण सुरू असतानाही, आरोपी लोकसेवक आनंद शिंदे याने तक्रारदाराला कारवाईची भीती दाखवली होती. गॅस गोदामाची वारंवार तपासणी न करणे आणि आलेल्या तक्रारींवर कारवाई न करण्यासाठी शिंदे याने २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यापूर्वीच कारवाईच्या भीतीपोटी तक्रारदाराने ३१ मार्च रोजी २५ हजार रुपये शिंदेला दिले होते.
एसीबीचा असा रंगला 'सापळा'
उर्वरित रकमेसाठी शिंदे याने तगादा लावल्यानंतर तक्रारदाराने १ एप्रिल रोजी सातारा एसीबीकडे धाव घेतली. एसीबीच्या पथकाने तात्काळ पडताळणी केली असता, तडजोडीअंती १ लाख २५ हजार रुपये स्वीकारण्याचे शिंदे याने पंचासमक्ष कबूल केले. सोमवारी (दि. ६) दुपारी जनसेवा सहकारी बँकेच्या कोरेगाव शाखा परिसरात सापळा रचण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद शिंदे याच्या सांगण्यावरून खाजगी इसम यांने (वय ३६, रा. बुरुड गल्ली, कोरेगाव) याने १ लाख २५ हजारांची रोकड स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून दोघांनाही ताब्यात घेतले.
तपासणीचा 'रेकॉर्ड' आणि आरोपींची कुंडली:
कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या घटनेनंतर कोरेगाव शहरात आणि तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एसीबीचे पथक आता या प्रकरणाच्या मुळाशी जात असून, या लाचखोरीच्या साखळीत आणखी कोणाचे आशीर्वाद आहेत का? याचा तपास करत आहे.
"सरकारी कामात कोणी लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी न डगमगता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा." > — एसीबी, सातारा पथक
दरम्यान, एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याने खाजगी हस्तकाचा वापर करून लाच घेतल्याने महसूल विभागाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून, सामान्यांकडून या कारवाईचे जोरदार स्वागत होत आहे.
|
तपशील |
माहिती |
|---|---|
|
मुख्य आरोपी |
आनंद कैलास शिंदे (पुरवठा निरीक्षण अधिकारी, वर्ग-२) |
|
सह-आरोपी |
(खाजगी इसम, रा. कोरेगाव) |
|
लाचेची मागणी |
२,००,००० रुपये |
|
तडजोड रक्कम |
१,२५,००० रुपये |
|
कारवाईचे ठिकाण |
जनसेवा सहकारी बँक परिसर, कोरेगाव |

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!