single-post

डॉ. करपे यांचे निलंबन रद्द करा, अन्यथा जिल्हा पेटून उठेल! ​'आरपीआय'चा जिल्हाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा; बहुजन समाज एकवटणार

बळीचा बकरा' बनवणे थांबवा; आरपीआयचा प्रशासनाला इशारा! ​शाहू-फुले-आंबेडकरांच्या जिल्ह्यात 'शेळी प्रवृत्ती' खपवून घेणार नाही - गणेश भिसे ​ओबीसी अधिकाऱ्यावर अन्याय? डॉ. संजय कांबळे यांचा गंभीर आरोप ​निलंबन रद्द न झाल्यास जिल्हाभर तीव्र जनआंदोलन; बहुजन समाज एक

01 April, 2026

डॉ. करपे यांचे निलंबन रद्द करा, अन्यथा जिल्हा पेटून उठेल!

'आरपीआय'चा जिल्हाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा; बहुजन समाज एकवटणार

सातारा दि.१ एप्रिल२०२६ | (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील मृतदेह अदलाबदल प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई म्हणजे शुद्ध अन्याय आहे. हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे. येथे प्रशासनाची ' प्रवृत्ती' खपवून घेतली जाणार नाही, असा घणाघाती इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष गणेश भिसे यांनी दिला आहे.

​या संदर्भात आरपीआयच्या शिष्टमंडळाने आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन डॉ. करपे यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.

बहुजन समाजाचा अधिकार हिरावू नका - गणेश भिसे

​आंदोलनाचे नेतृत्व करताना गणेश भिसे म्हणाले की, "डॉ. करपे यांचे निलंबन हा राजकीय आकसापोटी घेतलेला निर्णय वाटतो. प्रत्यक्ष दोष कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा असताना वरिष्ठांवर कुऱ्हाड चालवणे चुकीचे आहे. जर हे निलंबन मागे घेतले नाही, तर जिल्ह्यातील SC, ST, nt,VJ NT आणि OBC समाज बांधवांना सोबत घेऊन सातारा जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल."

निलंबन बेकायदेशीर -  संजय गाडे

​यावेळी बोलताना संजय गाडे  यांनी प्रशासकीय कारवाईवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, "महाराष्ट्रातील पहिले ओबीसी जिल्हा शल्य चिकित्सक असलेल्या डॉ. करपे यांचे निलंबन पूर्णतः बेकायदेशीर आहे. मृतदेहाच्या अदलाबदलीशी त्यांचा काडीमात्र संबंध नसताना केवळ समाजावरून त्यांना लक्ष्य केले जात असेल, तर हा अन्याय सहन केला जाणार नाही."

प्रशासनाला विचारला जाब

​आंदोलकांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्हा परिषदेतील वादाच्या घटनेत कारवाई का झाली नाही? मग डॉ. करपे यांच्यावरच ही घाई का? असे प्रश्न यावेळी विचारण्यात आले.