single-post

ज्ञान क्षेत्रातील नव गुन्हेगार..!

अभिजात भाषेचे ,कोण हे मारेकरी?

23 February, 2025

भारतीय माणसाचे श्रद्धेचे कोडे उलगडत नाही. इथल्या माणसांच्या श्रद्धेची बीज कोणती असतात ?श्रद्धेचे रोपण विचारातून होते का? श्रद्धा सहेतुक मूल्यवाचक अशी असते का ? श्रद्धेला अंधानुकरण याचा संसर्ग जडतो का? श्रद्धा ही मूल्य संवर्धित गोष्ट आहे का? श्रद्धेचे जतन आचरण केल्याने दैनंदिन वर्तनात सभ्यतेचा नैतिकतेचा काही अंश आढळ आढळून येतो का? श्रद्धा अस्मितेत कशी रूपांतरित होते? व्यक्तिगत श्रद्धेला अस्मितेचे आणि व्यापक अशा प्रतीक श्रद्धे कडे कोण रूपांतरित करते? या अनेक प्रश्नांची उत्तरे श्रद्धा, मूल्य, विचार  आणि प्रतीक राजकारण समजावून घेण्यासाठी हे सर्व पुन्हा पुन्हा अभ्यासले पाहिजे.

हा  विचार अभ्यासने  हे प्रबोधन असते. ते त्या कामाचाच भाग असतो.प्रबोधन हे  बोधात्मक विचार पुढे नेते .समाज हिताच्या नव्या विचाराचा प्रचार करीत  असते.प्रबोधन  हे मानव्याला प्रधान मानते. मानवी दुःख शोषण वेदना आणि अत्याचार यांच्या कार्याचा शोध घेऊन उपाययोजनासाठी नवचिंतन प्रबोधनातून मांडले जाते .प्रबोधनाला भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाच्या सम्यक विचाराचा ठाव घ्यावा लागतो . समाज जीवनातील श्रद्धा प्रतीके अस्मिता यांच्या राजकारणातून उद्भवणाऱ्या वर्तमानकालीन व भविष्यकालीन गंभीर समस्या याचा समकालातच ऊहापोह करणे ही ज्ञानात्मक कृती शैक्षणिक क्षेत्रात साहित्य क्षेत्रात कलाक्षेत्रात सतत केली गेली पाहिजे श्रद्धाआणि प्रतीके भारतीय अध्यात्मिक क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात संमिश्रपणे पुढे चालले आहेत प्रतिकातील श्रद्धा तपासली जात नाही. श्रद्धेची प्रतीके बनवण्याचे काम अस्मितेतून ज्ञानातून की भक्ती भावातून चालते हेही तपासले जात नाही.

समाजातील त्या त्या काळातील नायकांचे सामान्य माणसांचे कर्तुत्व हा सर्वसामान्य माणसांचा सततचा अभिमानाचा चर्चेचा विषय असतो तो कवणे शाहिरी कथा कविता नाटक यातून सांगितला ही जातो आणि त्यामुळेच आपल्या भूतकाळाची इतिहासाची महती वर्तमानाच्या समाजबांधवांना कळत राहते वर्तमानात इतिहास सांगणारे लोक मोठे जोखीमचे असे काम करीत असतात. त्यांची इतिहास कथनाची विशुद्धता वास्तवता आणि प्रस्तुतता खूप सम्यक असावे लागते ती अभिनेश विरहित निष्पक्ष असणे हे ज्ञान विश्वाचे पथ्य असते ती गरज असते विशेषत असते तो संशोधकीय ज्ञानाचा गुणधर्म असायला हवा तो पालन करायला हवा भारतीय ज्ञान विश्वात अशा प्रकारचे वर्तन सर्वत्र होताना आढळत नाही ही सगळी वैशिष्ट्ये प्रत्येक लेखक आणि सृजनशील हातांनी पालन करायला हवीत ती केली जात नसल्यामुळेच श्रद्धा आणि प्रतीकांच्या राजकारणाला हेतू वेगले चिकटवले जातात. विचारतून श्रद्धा आदराची त्यागाच्या जाणिवेची निर्माण होते कालच्या  कालखंडातील चरित्र गायन सर्वत्र चालू असते अध्यात्म राजकारण शिक्षण इतिहास शास्त्र संगीत अशा अनेक क्षेत्रातील योगदान कर्त्यांचे जीवनकथा ही मोठी एक ज्ञानप्राप्तीचीच गोष्ट असते या सर्वांच्या मध्ये इतिहासाचे अनिवार्य वेडजनसामान्यांना सतत लागून राहते.

सुधारक आणि इतिहास पुरुष यांच्यामध्ये सुद्धा फरक न करता अतिव श्रद्धेने भक्तीभावामध्ये वाचकांचे जाती बांधवांचे  भक्तांत रूपांतर होत राहतेआहे. ही मोठी घटना  आहे. यातूनच प्रतीक राजकारण पुढे जात आहे. आपला नायक हा आपला मुक्तीदाता असतो. हे  खरेच  आहे पण तपासून घ्यावे असाविचार मनात रुजणे आणि तो बाळगणे ही मोठी मानवी  विचार कृतज्ञतेची गोष्ट आहे .भारतीय माणसाची श्रद्धा आणि कृतज्ञता यामध्ये खूप संमिश्रता श्रद्धा मूल्यांच्या वरील असायला हवी मूल्य नवनीत असायला हवीत कृतज्ञता त्या व्यक्तीच्या कार्याच्या प्रति बाळगायला हवी त्या व्यक्तीचा सुधारकाचा इतिहास नायकाचा त्याग आणि कर्तुत्व याचे स्मरण कृतज्ञतेने करणे अपेक्षित असते कृतज्ञता हा जीवनमूल्य भाव अतिव आदराने बाळगणे ही मानवी संस्कृतीची मूल्य श्रृंखला आहे अशा कृतज्ञतेच्या वर्तनातूनच सम्यकता पुढे जाते पण निव्वळ श्रद्धेला न तपासता त्यातील विचाराचे परिशिलन न करता अनुयायी भक्त समाज बांधव आपल्या नायकाचे गौरवीकरण करणे स्वतःहून सुरू करतात या श्रद्धा प्रतीकाच्या प्रवासात अभ्यासात लेखक यांची मोठी जोखीम असते त्यांनी आपल्या लेखनातून त्या नायकांना अनावश्यक विचारमूल्य चिकटवणे टाळायला हवे त्या नायकाचा इतिहास त्या नायकाच्या कालखंडातील विचाराचा संघर्ष ते समाज वर्तन आणि त्या काळातील संघर्षाचा वास्तव इतिहास हे सर्व काही समजावून न घेता नायकांचे

उदाती करण करण्यासाठी लेखकाच्या स्वयं लोकप्रियतेसाठी अनाइतिहासिक अवास्तव आणि अशास्त्रीय कधीही तार्किकतेवरनं टिकणारी कर्तुत्वाची निशाणी अशा व्यक्तिमत्त्वाला चिकटवत राहणे हे लेखकाचे व्यभिचारी वर्तन असते लेखक आपल्या लेखन धर्माला न जागता केवळ स्वयं प्रतिष्ठा लोकप्रियता याच्यासाठी तो विचार प्रतारणा  करत असतो.

मराठी भाषेत अभ्यासक यांना बहुसंख्यांकाच्या अभिरुचीची काळजी वाटून राहते. ते सतत समाजाला काय वाटेल? काय आवडेल? काय रुचेल? याचा अंदाज घेऊन आपल्या लेखनाचा बेत आखतात.

विशेषतः बहुसंख्यांकांच्या नायकांच्या जीवनकथा अतिरंजीत पद्धतीने आवास्तव  मूल्य चिकटवून मांडण्याचा सपाटा मराठी मधील चरित्र लेखनामध्ये चालू आहे. त्यामुळे भीती अशी वाटते की ,सुधारकांची अस्सल चरित्रे समाजापुढे न येता सत्तरच्या दशकात  जशी कादंबरी लेखनातून कल्पकता ,रंजकता, अद्भुतता आणि आन ऐतिहासिकता याच्या आधारे जसे मराठीत इतिहासाचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण केले गेले, आणि त्यातून तब्बल स्वातंत्र्य उत्तर काळात 50 वर्षाचा इतिहास हा अतिरंजीत कल्पित आणि स्व समर्थनाचा प्रक्षेपित इतिहास मराठीत लादला गेला आहे. तोच आधारभूत मानून चुका सामान्य माणसाकडून गेली काही दशके चालू. हे सर्व संकट माहीत असूनही बहुसंख्यांकांच्या नायकांची प्रतिमा उजळ करण्याच्या नावाखाली अतिरजीत आवाजवी तो मूल्य भाव चिकटवणे जी मूल्य समाज जीवनात त्या कालखंडाचा अस्तित्वात नव्हती .अशा मूल्य भावांची निवड करून त्या व्यक्तिमत्त्वात अशी विचारधारा होती. अशी मूल्य ते वर्तनात आणत होते. अशा प्रकारचा स्वयं समर्थनाचा विचार इतिहासातील आपल्या नायकांच्या व्यक्तिरेखांना चिकटवणे ही फार मोठी ज्ञानक्षेत्रातील गुन्हेगारी आहे. 

सम्यकता, नव दर्शनीकता आणि जागतिक ज्ञान विश्वातील काही शाब्दिक विशेषणे निवडून एका विचार झालेला व्यक्तिमत्त्वांना जोडणे हा त्या व्यक्ती जीवनाच्या चरित्रावर तर अन्याय असतोच परंतु वाचक आणि पुढील पिढी अभ्यासदृष्टीने   त्या समस्याही असतात.

हा अनावश्यक मूर्ती रंजक प्रतिमा निर्माणचा इतिहास लेखनाचा प्रयत्न मराठी भाषेत सध्या मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे बहुसंख्यांकांच्या नायकाचे वास्तव मूल्यमाप न वस्तुनिष्ठ होणे आता आशक्य झाले आहे .श्रद्धावंतांच्या श्रद्धा क्षणात अशा वस्तुनिष्ठ मूल्यमापनाच्या विश्लेषणातून दुखवतात आणि उद्रेक निर्माण होतो. असंतोष पेटतो आहे. समाजामध्ये प्रतिकांचा अपमान केला गेला. अशी ओरड सुरू होते ,आणि समाज दुभंगू लागतो .दंगली होतात. हे सर्व होऊच नये .हे होता ही कामा नये. त्यासाठी श्रद्धा आणि प्रतीके यांची साक्षरता समाज मनामध्ये ज्ञानाच्या पातळीवर गांभीर्याने रुजवायला हवी  आहे.व्यक्ती जीवनातील श्रद्धा भाव आणि  प्रतीक निर्मिती करणारे राजकारण करते कोण आहेत?

हे समाजाला विचार साक्षरतेसाठी पटवून देण्याची गरज आहे मराठी भाषेत विचार साक्षरता ही तुही आता कच्ची अशीच आहे इथे श्रद्धा अस्मिता भक्ती भाव ज्ञाती बांधवांची विचारधारेची निष्ठा असा सगळा विभाजनाचा पसारा इथे व्यापून राहिला आहे सर्व क्षेत्रातील ही विभाजन मराठी भाषेचे ज्ञान विश्वाचे मोठे संकट आहे मराठी भाषेत आपण लेखक अभ्यास कोणत्या चुका करीत आहोत हे समजून घेणे किती महत्त्वाचे आहे.

ज्ञानाच्या क्षेत्रात परिशिलन ,मीमांसा, चिकित्सा, परखड मांडणी ,वास्तवता आणि साधार इतिहासाची पुरावे ही सगळी शिस्त लेखक  अभ्यासक कधी अंगी बाळगणार ?अशी सार ही खरी काळजी वाटून राहते. इथले सर्व विद्यापीठे संशोधन अत्यंत हिणकस चालले आहे काय? चोरीचे विकत घेतलेले आणि उचलेगिरीचे मोठ्या प्रमाणात आहे का? त्यामुळे नवनीत ज्ञानाची प्रचिती सर्व विषयातील ज्ञान संशोधन विषयातून आढळून येत नाही . हे खरे आहे  का,?विचारधारांचे तर्कशुद्ध विश्लेषण आणि जागतिक संदर्भीय आधार आणि देशी वास्तव ही विचाराची किमान शिस्त सर्व विषयांच्या ज्ञान विश्लेषणात असायला हवी ती भारतीय भाषांच्या मराठी मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून यायला हवी ती कमी होताना दिसते हे फार मोठे दुःख आहे भाषांतरित विश्लेषण चिंतन आधारित नवदार्षणिक विचार यामध्ये फरक असतो भाषांतराच्या तंत्र युगात ज्ञानाची अस्सलता आणि सत्यता लुप्त झाली आहे हे पण समजून घेणारे वाचक मोठ्या प्रमाणात नाहीत आणि त्यामुळे वाचकांची अर्ध निरक्षरता आणि लेखकाची अर्थसाक्षरता आणि प्रतीक राजकारनतील स्वार्थ हा विश्लेषण करणाऱ्या लेखक संशोधन करणारे संशोधक यांच्यामध्ये वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे मराठीचे वास्तव परखंड संशोधकीय विश्लेषण हे कमी होताना आढळून येते लोकप्रियता मान्यता आणि समाजवाचकांच्या पातळीवर स्वीकृती यासाठी बहुसंख्यांकांच्या मनाला चू चकारणे त्यांना आवडेल अशी ज्ञान विशेषणे वापरून आपले सुधारक यांच्या प्रतिमांचे महिमा मंडन करणे हा मराठी साहित्यातील अत्यंत खपून घेणारा लेखन प्रकार आहे हा जरा गांभीर्याने विद्यापीठ प्राध्यापक तरी समजावून घेतील काय? असा प्रश्न अनाठही उपस्थित होतो पण तो उपस्थित करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

प्रतीकांचे राजकारण ही श्रद्धेतून अध्यात्मतून पुढे आलेली मनोवृत्ती आहे प्रतिकांचे राजकारण हा अध्यात्मकला सांस्कृतिक क्षेत्रातल्या राजकारणाचा नित्य उद्योग आहे अशी प्रतीके तयार करून त्या त्या जनसमुहाच्या पुढे ठेवले की त्या जनसमुहातील विचार चिकित्सा संपून जाते .ते भक्ती भावानेलीन होतात आणि आपले मुक्तीचा अंतिम विचार आपल्याच नायकांच्या पायाजवळच आहे . श्रद्धेत  आहे. असे ते गृहीत धरतात आणि यातूनच प्रतीक राजकारण अस्मितेच्या दुखऱ्या घटनांकडे जाते. मग प्रतिक हे शत्रुभावासाठी वापरता येते आणि त्यातून समाज दुभंगण्याची प्रक्रिया सुरू होते कोणत्याही समाजातील प्रतिकांची आदराची, रक्षणाची जबाबदारी समाजाचीच असते समाज हे सर्व कळत नाही म्हणूनच अशा एकांगी असंतोषी उद्रेकी भूमिका घेऊन उन्मादी वर्तन करू लागतो.

सांस्कृतिक राजकारणाचे प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी नेहमी असे विभाजित विखुरलेले नायक तयार कराव्या लागतात आणि त्या नायकांच्या पूजांच्या गर्दीमध्ये समाज वर्तमानाचा विचार समस्या सर्व विसरतो आणि अस्मितेत दंग राहतो ही सांस्कृतिकता वर्चस्वासाठी उपयोगी पडते याला भक्ती भाव म्हणतात याला श्रद्धा म्हणतात याला इतिहास प्रेम म्हणतात याला आपल्या नायकांच्या प्रति निष्ठा म्हणतात पण हे सर्व वर्तन कपट पद्धतीने घडवून आणलेल्या असते असा आज वरचा आध्यात्मिक क्षेत्रातला इथला इतिहास आहे.

आजवर समाजात असंख्य असलेली प्रतिकांची यादी किंवा प्रतिकांचा मोठा अभिमानाचा अस्मितेचा इतिहास खरवडून पाहिला चिकित्सेच्या पातळीवर तपासायचा प्रयत्न केला तर हे सर्व अंतरंग आढळून येतात आणि अनेक नायकांच्या चोऱ्या अनेक नायकांचे उदात्तीकरण अनेक नायकांचे आ वास्तव मूर्ती मंडन केलेले आढळून येते आणि त्यामुळे मराठी भाषेत कोणत्याही विचारणायकांच्या इतिहासाची साद्या र मांडणी आढळून येत नाही इथे सांस्कृतिक क्षेत्रातील ज्ञान क्षेत्रातील कावेबाज धूर्त व्यक्तींनी केलेल्या या ज्ञान क्षेत्रातील गुन्हेगारीवर्तनामुळे समाजातील श्रद्धा प्रतीक आणि अस्मिता यांचा व्यवहार दूर ठेवण्याऐवजी संघर्षात मध्ये केंद्रभूत केला जातो आणि त्यातूनच समाजाचे ज्ञानावरचे लक्ष विचलित होते.

मराठी भाषेतील ही दुरावस्था कोणी समजून घेण्याच्या मानसिकतेतील आहेका? वर्तमानातील लेखक लोकप्रियता भविष्यातील प्रदूषितता असून ज्ञान क्षेत्रातील वैरण अवस्थेला ते कारणीभूत असतात.असा हा जगाचे ज्ञान क्षेत्राचा इतिहास आहे, म्हणून वर्तमानातील परखड ,वास्तव ,निरपेक्ष वृत्तीने तपासून मांडत राहणे. हे अभ्यासकांचे वर्तन जर झाले नाही ,तर त्या भाषेतला व्यवहार हा प्रतिकआणि श्रद्धां चे 

जंजाळात संपून जातो. अडकून राहतो .आज मराठी भाषेत हे घडले आहे .हे घडते आहे .हे चालू आहे. हे वाढते आहे आणि म्हणून श्रद्धा आणि प्रतीक यांच्या कपट राजकारणाचा खेळ करणाऱ्या सांस्कृतिक व्यक्ती संघटना व विद्यापीठीय प्राध्यापक यांच्यापासून मराठी भाषिकांनी वाचकांनी खूप सावध राहून त्यांना स्वीकारले पाहिजे .तपासले पाहिजे. दूर ठेवले पाहिजे. माध्यमानि याबद्दलची सजगता बाळगून याची परिशिलन  करायला हवे आहे. तरच ज्ञान व्यवहार सशक्त होतील आणि भविष्यातील अस्मितांच्या लढाया रक्तपाताकडे न जाता शांती सद्भावाकडे ,विशुद्ध ज्ञानाकडे आणि एकात्म समाज निर्मितीकडे हा सर्व प्रबोधनाचा प्रपंच पुढे जात राहील.

मराठी भाषेच्या रोज आरोळ्या ऐकावयास मिळतात. मराठी भाषा अभिजात भाषा असे ढोल ऐकावयास मिळतात. मराठी माणसांचा जोश त्वेष शांत होऊन ज्ञान शिस्तीकडे तो जायला हवाआहे. अन्यथा दुभंगलेले ज्ञानक्षेत्र दुभंगलेला समाज आणि सतत उद्रेकाच्या घटनांना सामोरे जाणारे जनसामान्य यांच्या वाट्याला हे सर्व येऊ द्यायचे नसेल, तर  श्रद्धेची साक्षरता तसेच सांस्कृतिक वाद्यांनी चालवलेले प्रतीक निर्मितीच्या फॅक्टरी उद्योगाचे उत्पादन हे आता थांबवले पाहिजे. अस्मितांच्या लाटावर समाजाच्या भयग्रस्त जगणे. थांबवले पाहिजे, आणि समाज  वर्तन स्थिर शांत सदभावी असे एकात्म सतत कसे होईलयासाठी निरपेक्ष ज्ञान विश्वाच्या सगळ्या कौशल्यांची स्वीकृती सर्व ज्ञान क्षेत्रात कशी केली जाईल? ती करण्यास भाग कसे पाडले जाईल?व्यक्तीची स्वयंप्रतिष्ठा आणि प्रतीक निर्मितीच्या राजकारणाची लोकप्रियता हे किती घातक परिणामकारक आहे? हे खूप समजावून घेण्याची गरज असल्यामुळेच हे शब्दबद्ध केले आहे 

परखडता आणि वास्तवता आणि साधार इतिहासाच्या आधारे केलेली मांडणी ही आपल्या कोणत्याही नायकाच्या जीवनातील उणीव नाहीत दोष नाहीत. तर त्या काळाच्या व्यक्तीच्या मर्यादा आहेत त्या काळातील आदान प्रदान विश्वाचीमर्यादा होती हे समजून घेण्यामध्ये न्याती बांधवांच्या मनात कमी पण असण्याची गरज नाही आणि सर्वांकष सर्वमूल्यधारकता ही कोणत्याच इतिहास नायकाच्या अंगी असत नाही. काळ आणि बदल संक्रमण आणि गतिमानता आणि साक्षरता ही असंख्य कारणे विचाराच्या स्वीकृतीला जबाबदार असतात ,आणि म्हणून हे समजावून घेऊन असा चुकीचा संकीर्ण मनोवृत्तीचा प्रयत्न अभ्यासकाने करता कामा नये अशी अपेक्षा गैर ठरत नाही .कारण अभ्यासकांपेक्षा प्रबोधन विशुद्ध पणे पुढे जाणे आणि समाज मनाच्या तार कीक कसोट्यांवर ते उतरणे फार महत्त्वाचे असते.जगभर चा ज्ञान व्यवहार हा  तर्क अनुमान सैद्धांतिक मांडणी विश्लेषणाची शिस्त आणि विचार पद्धतींच्या प्रकाराच्या आधारे पुढे निघाला आहे .महाराष्ट्रात मात्र ज्ञानाच्या व्यवहारामध्ये हे सगळे गुण अभावाने आढळतात आणि स्व जातींच्या नायकांची

चिकित्सा मांडणी समीक्षा परिशिलन इतरांनी करायचीच नाही .अशा प्रकारची अस्पृश्यता आणि बहिष्कृतता आणि संघर्ष रचना आता तयार करणे चालू झाले .ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. हे टाळणे हेच मराठीचे अभिजात होणे आहे. मराठी ज्ञानाच्या पातळीवर अभिजात होणार आहे का ?साहित्यातील वांग्मयीन प्रकारातील नव संवेदनशील ज्ञानाच्या मांडणीतून अभिजात होणार आहे. हे काळ ठरवेल ,पण मराठी भाषिकांचा लेखकांचा संकीर्ण वाद हाच मराठीच्या अभिजात भाषेच्या भविष्यातील अडसर आहे.