कोरेगावात ‘म्हसवडकर सराफ’चे दालन सुरू; सोन्या-चांदीसह हिरे, रत्नांच्या दागिन्यांची विविधता एकाच छताखाली
सातारा-पुणे-मुंबईला जाण्याची गरज नाही; आझाद चौकात ग्राहकांसाठी दागिन्यांचे नवीन दालन
31 August, 2026
कोरेगाव दि. 31 ऑगस्ट2026 जरडेश्वर समाचार वृत्त जनसेवा : कोरेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी सुवर्णदागिन्यांच्या खरेदीसाठी आता सातारा, पुणे किंवा मुंबईला जाण्याची आवश्यकता राहणार नाही. ‘म्हसवडकर सराफ’ या विश्वासार्ह नावाचे नवीन दालन सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी कोरेगाव शहरातील आझाद चौक, कराड अर्बन बँकेशेजारी येथे ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे.
म्हसवडकर सराफ यांच्या या नवीन दालनात सोन्या-चांदीचे दागिने, हिरे व विविध प्रकारच्या रत्नांचे दागिने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महिला, पुरुष तसेच लहान मुलांसाठीही आकर्षक आणि विविध प्रकारच्या दागिन्यांची मोठी व्हरायटी येथे पाहायला मिळणार आहे.
महिलांसाठी पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइनचे विविध दागिने, तर पुरुषांसाठीही त्यांच्या पसंतीनुसार आकर्षक दागिन्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर चांदीचे पैंजण, जोडवी, मासोळी यांसह अनेक प्रकारच्या चांदीच्या वस्तूंची विशेष विविधता दालनात उपलब्ध करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी आकर्षक पैंजण व इतर दागिन्यांचे प्रकारही येथे उपलब्ध आहेत.
‘विश्वास, आपुलकी आणि नम्र सेवा’ हेच वैशिष्ट्य
ग्राहकांचा विश्वास जपत आपुलकीने आणि नम्रतेने सेवा देण्याचा प्रयत्न म्हसवडकर सराफ यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तत्पर सेवा, भरपूर व्हरायटी आणि ग्राहकांच्या पसंतीला प्राधान्य ही या नव्या दालनाची वैशिष्ट्ये असल्याचे सांगण्यात आले.
कोरेगाव शहर व तालुक्यातील ग्राहकांना आपल्या पसंतीचे दागिने एकाच ठिकाणी पाहता यावेत आणि खरेदीचा समाधानकारक अनुभव मिळावा, या उद्देशाने हे नवीन दालन सुरू करण्यात आले आहे.
आपल्या मनपसंत दागिन्यांच्या खरेदीसाठी आजच भेट द्या—
म्हसवडकर सराफ, आझाद चौक, कराड अर्बन बँकेशेजारी, कोरेगाव.
म्हसवडकर सराफ — विश्वास जपणारी आपुलकीची, नम्र आणि तत्पर सेवा!

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय