अंधश्रद्धा हद्दपार करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज
भावी शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून समाजाला अंधश्रद्धामुक्तीची दिशा द्यावी; ‘स्नेहबंध गटा’चा उपक्रम उत्साहात संपन्न
20 August, 2026
अंधश्रद्धा हद्दपार करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज
कोरेगाव दि.२०(जरंडेश्वर समाचार वृत्त जनससेवा) : देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी अनिष्ट रूढी-परंपरा व अंधश्रद्धा हद्दपार करणे अत्यंत गरजेचे आहे. भावी शिक्षक आणि तरुण पिढीने स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून समाजाला योग्य दिशा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे परखड प्रतिपादन प्रमुख प्रवक्ते दिलीप वाघमारे सर यांनी केले.
कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी.एड.), इंदोली यांच्या पुढाकाराने शालेय आंतरवासिता टप्पा-२ अंतर्गत ‘स्नेहबंध गट’ कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून वाघमारे बोलत होते.
वाघमारे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व प्रबोधनात्मक व्याख्यानातून अंधश्रद्धेचे सामाजिक दुष्परिणाम, अनिष्ट रूढी-परंपरांचे निर्मूलन आणि वैज्ञानिक विचारसरणीचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी भावी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. एस. पाटील यांनी प्रोत्साहन दिले. मार्गदर्शक प्रा. सौ. सुनीता बोर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सूर्यवंशी व पर्यवेक्षिका सौ. निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पोळ व अबोली भोसले यांनी नेटकेपणाने केले. मजहरअली मणेर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रियांका भोसले यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. मानसी वाघमारे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कै. रामराव निकम बी.एड. महाविद्यालय, इंदोली येथील ‘स्नेहबंध गटातील’ छात्र-अध्यापकांनी पूर्वतयारीपासून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनापर्यंत विविध जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या. गटप्रमुख मेघा बर्गे, सुप्रिया साबळे, गौरी जरे, अमृता निकम, मनुजा शिंदे, रेश्मा कांबळे व वैभवी रासकर यांच्यासह सर्व छात्र-अध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय