single-post

संजय पिसाळ यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा; मित्रपरिवाराचा उत्स्फूर्त सहभाग

कोरेगाव शहरासह कास पठार-बामणोलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन; जयवंत भोसले यांच्याकडून संजय पिसाळ यांच्या सामाजिक कार्याचा गौरव

21 August, 2026

संजय पिसाळ यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा; मित्रपरिवाराचा उत्स्फूर्त सहभाग

कोरेगाव शहरासह कास पठार-बामणोलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन; जयवंत भोसले यांच्याकडून संजय पिसाळ यांच्या सामाजिक कार्याचा गौरव

कोरेगाव दि.२१ ऑगस्ट २०२६(जरंडेश्वर समाचार) : सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले संजय पिसाळ यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) कोरेगाव शहरासह कास पठार आणि बामणोली परिसरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी केक कापून, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय पिसाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळपासूनच कोरेगाव शहरात संजय पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. जरंडेश्वर फिटनेस येथेही त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आझाद चौक मित्र मंडळाच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांनी संजय पिसाळ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

दुपारनंतर वाढदिवसाचा उत्साह आणखी वाढला. सातारा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक व कोरेगाव माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत दादा भोसले व मित्र परिवारांनी सातारा येथे त्यांचा केक कापूस शाल श्रीफळ देऊन  सन्मान केला . सातारा परिसरात मोठ्या प्रमाणात संजय पिसाळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संजय पिसाळ आणि त्यांचा मोठा मित्रपरिवार कास पठार परिसरात दाखल झाला. त्यानंतर बामणोली येथून बोटींच्या माध्यमातून वाढदिवसाचा जल्लोष करण्यात आला. संजय पिसाळ ज्या बोटीत होते, तिच्या मागोमाग सुमारे १२ ते १३ बोटी मित्रपरिवाराला घेऊन प्रवास करत होत्या. प्रत्येक बोटीत मोठ्या संख्येने मित्रपरिवार सहभागी झाला होता. जलाशयातील बोटींची ही रांग आणि त्यातील मित्रांचा उत्साह पाहता जणू एखाद्या चित्रपटातील दृश्यच साकारल्याचा अनुभव उपस्थितांना आला.

सुमारे तासभर बोटीतून प्रवास केल्यानंतर मित्रपरिवार चौधरी रिसॉर्ट येथे पोहोचला. तेथे संजय पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मित्रपरिवाराने जल्लोष करत आनंद व्यक्त केला. अनेकांनी ताल धरत नृत्याचा आनंद घेतला. संपूर्ण वातावरण उत्साह, आनंद आणि मैत्रीच्या भावनेने भारावून गेले होते.

यावेळी सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक तसेच कोरेगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले यांनी संजय पिसाळ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांच्या मैत्रीचा आणि सामाजिक कार्याचा आवर्जून उल्लेख केला.

जयवंत पवार म्हणाले, “संजय पिसाळ आणि माझी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. आम्ही दोघांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करताना सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कोणाला अडचण आली तर मदतीसाठी धावून जाणे ही आमची भूमिका राहिली आहे. संजय पिसाळ यांचा मित्रपरिवार मोठा असून, त्यांनी कोरेगाव शहरातील अनेकांना अडचणीच्या काळात मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत आज मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार उभा आहे.”

संजय पिसाळ यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना जयवंत पवार यांनी त्यांच्या निवडणुकीतील विजयाचेही कौतुक केले. “कोरेगाव शहरात त्यांनी ज्या ज्या निवडणुका लढवल्या, त्या त्या वेळी त्यांनी निर्विवादपणे विजय मिळविला आहे. आजपर्यंत त्यांचा पराभव झालेला नाही. त्यामुळे ते अजिंक्य आहेत आणि पुढेही अजिंक्य राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित मित्रपरिवारातील अनेकांनी संजय पिसाळ यांच्या कार्याचा गौरव करत मनोगत व्यक्त केले. मित्र, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छांबद्दल संजय पिसाळ यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे, मित्रपरिवाराचे आणि शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो. कोरेगाव शहराने मला भरभरून प्रेम दिले असून, मी कोरेगावकरांचा ऋणी आहे. आजपर्यंत कोरेगावकरांनी मला कधीही पराभवाचा सामना करू दिला नाही. ज्या ज्या ठिकाणी मी उभा राहिलो, त्या त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने मला विजयी केले. कोरेगावकरांच्या प्रेमातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही. कोरेगावच्या ऋणात राहणे मला आवडते.”

“माझ्यासोबत आज एवढा मोठा मित्रपरिवार उभा आहे, हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. मित्रांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मदतीला धावून जाणे हे मी माझे कर्तव्य समजतो. येणाऱ्या काळातही असेच प्रेम आणि आशीर्वाद सर्व मित्रपरिवाराकडून मिळत राहावेत,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर मित्रपरिवाराने पुन्हा बोटीने बामणोलीकडे प्रवास केला. त्यानंतर कोरेगावच्या दिशेने रवाना होत वाढदिवसाच्या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता करण्यात आली. संजय पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला हा जल्लोष मित्रत्व, सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचे दर्शन घडविणारा ठरला.