जिल्हा परिषदेत आ. धैर्यशील कदम यांची सदिच्छा भेट
उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले यांनी शाल, बुके देऊन केला सत्कार; विकासकामांवर झाली चर्चा
10 August, 2026
सातारा : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले यांच्या दालनात आ. धैर्यशील कदम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले यांनी आ. धैर्यशील कदम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
या सदिच्छा भेटीदरम्यान जिल्ह्यातील विविध विकासकामांसह जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कामांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध प्रश्न, विकासाच्या गरजा तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबतही यावेळी अनौपचारिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी राजू भैय्या भोसले यांनी आ. धैर्यशील कदम यांना जिल्हा परिषदेत वेळोवेळी भेट देऊन विकासकामांचा आढावा घ्यावा, तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन केले.
भेटीदरम्यान राजकीय विषयांपेक्षा विकासकामे आणि जिल्ह्याच्या हिताच्या विविध मुद्द्यांवर गप्पा-गोष्टी झाल्या. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास यांसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील विविध प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
आ. धैर्यशील कदम यांनीही जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याची भूमिका व्यक्त केली. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची महत्त्वाची यंत्रणा असून तिच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहणे आवश्यक असल्याचे यावेळी चर्चेतून अधोरेखित झाले.
सदिच्छा भेटीच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांना लोकप्रतिनिधींच्या समन्वयाची जोड मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे,विराज शिंदे,सागर शिवदास पदाधिकारी, अधिकारी व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय