single-post

​संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त सातारा वनविभागाचा 'हरितवारी वृक्षदिंडी सोहळा'

​वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सीड बॉलचे वाटप आणि 'हरितवारी वन'चे होणार उद्घाटन

16 July, 2026

सातारा | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा :

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, पर्यावरण संवर्धनाचा व्यापक संदेश देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे उद्या शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी "हरितवारी वृक्षदिंडी सोहळा २०२६" चे आयोजन करण्यात आले आहे. "वृक्ष असती वसुंधरेचे जीवन, वृक्ष लावून करूया तिचे रक्षण" या घोषवाक्याखाली आयोजित या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायासोबत पर्यावरण संरक्षणाची लोकचळवळ उभारण्याचा वनविभागाचा मानस आहे.

​या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन सातारा वनविभाग (प्रादेशिक), सह्याद्री व्याघ्र राखीव (वन्यजीव) कराड, सामाजिक वनीकरण विभाग सातारा आणि कुंडल वन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

​वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती व उद्घाटनउद्घाटक

मा. श्रीमती श्रीलक्ष्मी ए. (भा.व.से.)

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर वनवृत्त

प्रमुख जातीय

मा. श्री. तुषार सदस्य (भा.व.से.)

संचालक,

सह्याद्री व्याघ्र राखीव

अध्यक्ष

मा. श्री. अमोल सातपुते (भा.व.से.) उपवनसंरक्षक, सातारा वनविभाग

मा. श्री. धैर्यशील पाटील

मा. श्री. सागर गवते

मा. श्री. हरिश्चंद्र वाघमोडे

मा. श्रीमती स्नेहलता पाटील

मा. श्री. मिलिंद दत्त शर्मा

मा. श्री. शतनिक भागवत

मा. श्री. किरण जगताप

मा. श्रीमती गिरीजा देसाई

मा. श्री. महेश झांजुर्णे

मा. श्रीमती श्रीमती रेश्मा व्होरकाटे 

​या सोहळ्याचे उद्घाटन कोल्हापूर वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) मा. श्रीमती श्रीलक्ष्मी ए. (भा.व.से.) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सह्याद्री व्याघ्र राखीवचे संचालक मा. श्री. तुषार सदस्य (भा.व.से.) आणि सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक मा. श्री. अमोल सातपुते (भा.व.से.) यांच्यासह वनविभागातील विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ५.३० वा.वृक्षदिंडी स्थळी प्रस्थान"वनभवन", सातारा

सकाळी ७.०० वा.वृक्षदिंडीचे पूजन व प्रारंभ (मुख्य वनसंरक्षक यांच्या हस्ते)मौजे तरडगाव, ता. फलटण

सकाळी ९.०० वा.अल्पोपहारहॉटेल आनंद, काळज

सकाळी ९.३० वा.वारकऱ्यांना सीड बॉल (Seed Ball) वितरणहॉटेल आनंद परिसर

सकाळी ९.४० वा."हरितवारी वन" चे उद्घाटन व वृक्षारोपणकाळज

सकाळी १०.१० वा.कार्यक्रमाची प्रस्तावना (मा. उपवनसंरक्षक, सातारा)कार्यक्रम स्थळ

सकाळी १०.१५ वा.मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर वनवृत्त) यांचे मार्गदर्शनकार्यक्रम स्थळ

सकाळी १०.३० ते १२.०० वा.वृक्षदिंडीचे मार्गक्रमणकाळज ते सुरवडी मार्ग

दुपारी १२.०० वा.वृक्षदिंडीचा समारोपहॉटेल निसर्ग, सुरवडी

दुपारी १२.१० वा.महाप्रसाद (भोजन)हॉटेल निसर्ग परिसर

दुपारी १२.३० वा.सांगता समारंभसुरवडी

पर्यावरणपूरक आणि लोकसहभागाचा अनोखा उपक्रम

​वनविभागाच्या या अभिनव उपक्रमातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि जैवविविधतेच्या संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. वारीच्या मार्गावर वारकऱ्यांना सीड बॉलचे (Seed Balls) वितरण केले जाणार असून, "हरितवारी वन" या संकल्पनेचा शुभारंभ आणि प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यामुळे हा उपक्रम केवळ शासकीय न राहता, त्याला मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

​सहभागाचे आवाहन:

सातारा वनविभागाने तमाम पर्यावरणप्रेमी नागरिक, वारकरी, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांना या "हरितवारी वृक्षदिंडी सोहळा २०२६" मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या या पवित्र चळवळीत आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे.