single-post

जंतरमंतर आंदोलनानंतर भाजप बॅकफूटवर नाही; केंद्राने मागण्या मान्य केल्या – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जंतरमंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या प्रश्नाला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रत्युत्तर 2. 'केंद्राने आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या; भाजप जनतेच्या प्रश्नांसाठीच काम करतो' 3. सोनम वांगचुक यांनी उपोषण, तर दीपक यांनी आंद

24 July, 2026

जंतरमंतर आंदोलनानंतर भाजप बॅकफूटवर नाही; केंद्राने मागण्या मान्य केल्या – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, दि. २४ जुलै  जरंडेश्वर समाचार वृत्त जनससेवा:-

दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर आला आहे का, असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हा आरोप फेटाळून लावत, केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून त्यामुळे भाजप बॅकफूटवर नसून लोकहिताचे निर्णय घेणारा पक्ष असल्याचे स्पष्ट केले.

सातारा येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार डॉ. अतुल भोसले, नगरसेवक अविनाश कदम आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जंतरमंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी, "प्रदेशाध्यक्ष राज्यभर दौरा करत असताना दिल्लीतील आंदोलनामुळे भाजप बचावात्मक भूमिकेत गेला आहे का?" असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे समाजसेवक सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले असून, दीपक यांनीही आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे भाजप बॅकफूटवर असल्याचा दावा वस्तुस्थितीला धरून नाही.

भोसले म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा जनतेच्या प्रश्नांवर काम करणारा पक्ष आहे. शेतकरी, युवक, महिला, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने निर्णय घेत आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आवश्यक तेथे सकारात्मक निर्णय घेणे ही सरकारची भूमिका आहे.

सरकार लोकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून, संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यावर विश्वास ठेवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या हिताचे निर्णय घेणे हीच भाजपची कार्यपद्धती असून, त्यामुळे पक्ष अधिक बळकट होत आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी, कृषी वीजबिल थकबाकी माफी, कृषी विकास योजना तसेच विविध विकासकामांबाबतही माहिती देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यभर सुरू असलेल्या संघटनात्मक दौऱ्याची माहिती दिली, तर आमदार डॉ. अतुल भोसले यांनी स्थानिक विकासकामांचा आढावा मांडला. नगरसेवक अविनाश कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.