single-post

कोरेगावचे उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांचा शिरूर नगरपरिषदेकडून जाहीर सत्कार

वाढदिवसानिमित्त घोडनदी येथे गौरव सोहळा; लोकाभिमुख कार्याचा मान्यवरांकडून गौरव

15 June, 2026

जरंडेश्वर समाचार 

घोडनदी (शिरूर) : प्रतिनिधी कोरेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तथा युवा नेतृत्व राहुल रघुनाथ बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर नगरपरिषद, घोडनदी यांच्या वतीने विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी, विकासाभिमुख विचारसरणी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत सातत्याने घेतलेल्या भूमिकेची दखल घेत नगरपरिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचर्णे होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष नितेश प्रदीप गादिया, मुख्याधिकारी प्रितम पाटील, नगरसेवक निलेश केरू गाडेकर, एजाज अन्सार बागवान सभापती स्वच्छता समिती,सुनील शंकर जाधव सभापती बांधकाम समिती , सुनिता आनंद भुजबळ, सागर त्रिंबक नरवडे, निलेश संजय पवार, अभिजित गणेश पाचर्णे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राहुल बर्गे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. कोरेगाव शहराच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले विविध उपक्रम, युवकांना दिलेले प्रोत्साहन, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि जनसामान्यांशी ठेवलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे त्यांनी अल्पावधीतच लोकमान्यता मिळविल्याचे वक्त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "राहुल बर्गे यांच्यासारखे युवा आणि अभ्यासू नेतृत्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रेरणादायी आहे. जनतेच्या हितासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून भविष्यातही त्यांच्याकडून समाजहिताचे कार्य अधिक जोमाने होईल, असा विश्वास आहे." उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांनी राहुल बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातून विकासकामांना गती मिळत असल्याचे सांगत राहुल बर्गे यांच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमास दत्तात्रय बर्गे (स्वच्छता निरीक्षक), सुरेश बोतालजी (संपादक, जरंडेश्वर समाचार), आरीफ बागवान, अजय निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे भावूक होत म्हणाले, "शिरूर नगरपरिषदेने माझ्यावर दाखविलेला स्नेह, विश्वास आणि आदर माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. हा सन्मान केवळ माझा नसून कोरेगाव शहरातील नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.

कोरेगावचा नावलौकिक राज्यभर वाढावा, शहर विकासाच्या बाबतीत आदर्श ठरावे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय मिळावा यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे." यावेळी उपस्थित मान्यवरांनी राहुल बर्गे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या आगामी राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख अधिक बळकट होत असून, भविष्यातही त्यांनी विकासकामे आणि जनसेवा याच ध्येयाने कार्यरत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सत्कार सोहळा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी राहुल बर्गे यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.


"जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद"

*"राजकारण हे केवळ पदासाठी नसून समाजकारणाचा प्रभावी मार्ग आहे. नागरिकांनी दाखविलेला विश्वास आणि प्रेम हेच माझे खरे भांडवल आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कोरेगावच्या विकासासाठी मी अधिक जोमाने काम करत राहीन,"असे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.यावरुन सविस्तर बातमी इमेज तयार करून द्या