single-post

कामेश दादा कांबळे मित्र समूहातर्फे ओपन टर्फ क्रिकेट नाईट स्पर्धेचे आयोजन

कामेश दादा कांबळे मित्र समूहातर्फे भव्य ओपन टर्फ क्रिकेट नाईट स्पर्धा संगम माहुली येथे रंगणार क्रिकेटचा थरार; आकर्षक रोख पारितोषिकांची लयलूट क्रिकेटप्रेमींसाठी सुवर्णसंधी; १३ व १४ जून रोजी ओपन टर्फ नाईट स्पर्धा

12 June, 2026

 जरंडेश्वर समाचार 

सातारा : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:

क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण ठरणाऱ्या ओपन टर्फ क्रिकेट नाईट स्पर्धेचे आयोजन मा. श्री. कामेश (दादा) कांबळे मित्र समूहातर्फे करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. १३ जून २०२६ ते रविवार दि. १४ जून २०२६ या कालावधीत सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत पार पडणार आहे.

स्पर्धेचे आयोजन सातारा-कोरेगाव रोडवरील संगम माहुली फाटा येथील ‘टर्फ नेस्ट’ मैदानावर करण्यात आले असून, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. कामेश विजय दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघासाठी प्रथम पारितोषिक रु. ११,०६९, द्वितीय पारितोषिक रु. ७,०६९, तृतीय पारितोषिक रु. ५,०६९ आणि चतुर्थ पारितोषिक रु. ३,०६९ असे आकर्षक रोख पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील ट्रॉफीचे सौजन्यही मा. श्री. कामेश (दादा) कांबळे मित्र समूह यांच्याकडून करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. ९९९ निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक संघात ८ खेळाडू सहभागी होऊ शकतील. सामने चार षटकांचे खेळविण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी काही नियम व अटी निश्चित करण्यात आल्या असून पंचांचा निर्णय अंतिम राहील. गैरवर्तन करणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल. वेळेच्या उपलब्धतेनुसार नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार संयोजकांकडे राखीव राहील. तसेच मैदानावर खेळताना एखाद्या खेळाडूस दुखापत झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित खेळाडूची राहील. उर्वरित नियम स्पर्धेच्या ठिकाणी जाहीर करण्यात येतील.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्क : ऋग्वेद शेडगे – ८४२१११३१०४
सुजल सूर्यवंशी – ९७६७८१३०२३
अभिजीत सावंत – ८६२५०२१६१४