जावलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक; भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज
शिवसेनेला दोन वेळा पालकमंत्री पद भेटून ही जावळी तालुक्यात भरीव निधीची तरतूद झाली नाही शिवसैनिकांची नाराजी
22 February, 2025
मेढा : दि.२२(प्रतिनिधी):महाराष्ट्रा मध्ये महायुतीचे जरी सरकार असले तरी जावली तालुक्यात सर्वकाही आलबेल आहे असे नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांना भाजपाचे नेते,मित्रपक्ष विचारत घेत नसल्याची तक्रार संपर्क दौऱ्याच्या बैठकीत करण्यात आली . याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी मेढा येथे आयोजित केलेल्या बैठकीत अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.शिवसेनेची मेढा ता. जावली येथे महत्त्वपुर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीत भाजपच्या स्थानिक पातळीवरील कार्यपद्धतीवर सर्वच पदाधिकारी यांच्याकडून टीका करण्यात आली. बैठकीला जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, शिवसेना महिला संघटिका सौ. शारदाताई जाधव, संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, विजय पाटील, संदीप पवार व जयश्री शेलार यांच्यासह पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
निलेश लंके तालुकाप्रमुख ते खासदार पदापर्यंत पोचलेले असे असंख्य कार्यकर्ते आहेत.शिवसेनेच्या बैठकीला मार्गदर्शन करताना चंद्रकांत जाधव व पदाधिकारी.कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. संघटना वाढेल पण, शिवसैनिकांचं काय ? युवा सेना तालुका प्रमुख चारचाकी घेऊन फिरतात. जिल्हा नियोजनचा एक सदस्य नाही. काम कसे करणार? सत्ता असूनही महायुतीमध्ये ते स्वतःचा फायदा बघतात. जिल्हाप्रमुख
शिवसैनिकांमुळे असतो. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत सचिन शेलार यांनी व्यक्त केले.या बैठकीला चंद्रकात जाधव, सौ शारदा ताई जाधव, विजय पाटील, एकनाथ ओंबळे, सुलोचना पवार, संजय सुर्वे, कल्पना पवार, पांडुरंग सपकाळ, शांताराम कदम ता, समीर गोळे, प्रशांत जुनघरे, संदीप पवार, विक्रम जाधव, जयश्री शेलार, निलेश निकम आदी उपस्थित होते.
भाजपच्या कुरघोडीमुळे जावळीत शिवसैनिकांना अडचणी येत आहेत संपर्क दौऱ्यात अनेक शिवसैनिकांनी उघडपणे भाजपवरील नाराजी बोलून दाखवली, सातारा जिल्हा पालकमंत्री पदी दोन वेळा शंभूराज देसाई यांची नियुक्ती झाली पण, जावळीला भरीव निधी मिळालेलि नाही. अशी खंत आणि तक्रार शिवसैनिकांनी व्येक्त केली.