कोरेगाव नगराध्यक्षपदासाठी डॉ. प्रदीप बर्गे व उद्योजक राजेंद्र बर्गे यांच्या नावाची जोरदार चर्चा
कोरेगाव नगराध्यक्षपदासाठी डॉ. प्रदीप बर्गे व राजेंद्र बर्गे यांच्या नावाची चर्चा • जनसंपर्क, मित्रपरिवार आणि सामाजिक कार्यामुळे नागरिकांकडून जोरदार मागणी • वैद्यकीय सेवा आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे दोन्ही नावांना शहरात वाढता प्रतिसाद •
02 June, 2026
कोरेगाव |जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:
:आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहरात नगराध्यक्ष पदासाठी विविध इच्छुकांची चर्चा सुरू असतानाच डॉ. प्रदीप बर्गे आणि उद्योजक राजेंद्र बर्गे यांच्या नावाची नागरिकांमधून जोरदार मागणी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील अनेक वार्डांमध्ये या दोघांनाही चांगला प्रतिसाद मिळत असून घराघरात त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
डॉ. प्रदीप बर्गे यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपत अनेक नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांमध्ये त्यांनी अनेकदा पुढाकार घेतल्याने शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक घटकांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याचे बोलले जात आहे.
तर उद्योजक राजेंद्र बर्गे हे व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी नाव म्हणून ओळखले जातात. त्यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय असून कोरेगाव शहरात तसेच परिसरात त्यांची मोठी ओळख आहे. याशिवाय त्यांचे अनेक रोडटच कॉम्प्लेक्स तसेच व्यावसायिक जागा आणि जमिनी असल्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. विविध व्यवसायांच्या माध्यमातून त्यांनी मोठा मित्रपरिवार आणि व्यापक जनसंपर्क निर्माण केला आहे.
शहरातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राजेंद्र बर्गे यांचा सक्रिय सहभाग राहिल्याने युवक वर्गात त्यांच्याबद्दल विशेष आकर्षण असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांशी सहज संवाद साधण्याची त्यांची शैली तसेच शहर विकासाबाबत असलेली भूमिका यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे.
कोरेगाव नगरपंचायतीला विकासाभिमुख, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नेतृत्व मिळावे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी नगराध्यक्ष पदासाठी डॉ. प्रदीप बर्गे आणि उद्योजक राजेंद्र बर्गे यांच्या नावाभोवती राजकीय वातावरण तापू लागल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
दरम्यान, आगामी काळात नगरपंचायत निवडणुकीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांकडून जनसंपर्कावर भर दिला जात आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय