कोरेगाव नगराध्यक्षपदासाठी सचिनभैय्या बर्गे यांनाच उमेदवारी द्या!
सर्वसामान्य ग्रामस्थ, युवक अन् महिला वर्गाची आमदार महेश शिंदे यांच्याकडे जोरदार मागणी; कोरेगावातील राजकीय वातावरण तापले, बर्गे यांच्या नावाला सर्वस्तरातून वाढता पाठिंबा
28 May, 2026
कोरेगाव | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा :: कोरेगाव नगरपंचायतीच्या आगामी नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळ्या नावांची चाचपणी सुरू असतानाच, आता कोरेगावच्या नगराध्यक्षपदासाठी विद्यमान नगरसेवक सचिनभैय्या बर्गे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी जोरदार आणि थेट मागणी सर्वसामान्य ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे. कोरेगाव शहरातील विविध आबालवृद्धांसह सर्व स्तरांतील नागरिकांकडून सचिनभैय्या बर्गे यांच्या नावाला जाहीर पाठिंबा मिळत असल्याने, लोकप्रिय आमदार महेश शिंदे यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.
जनतेच्या गळ्यातील ताईत: साधे आणि मनमिळावू नेतृत्व
सचिनभैय्या बर्गे हे कोरेगाव नगरपंचायतीमधील एक अत्यंत सक्रिय, अभ्यासू आणि कार्यतत्पर नगरसेवक म्हणून ओळखले जातात. अत्यंत साधा, मनमिळावू आणि सर्वसामान्य माणसांशी थेट नाळ जोडणारा स्वभाव ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. अल्पावधीतच त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधी पदाच्या पलीकडे जाऊन जनतेच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. आज कोरेगाव शहराच्या कोणत्याही भागात, गल्लीबोळात अथवा चौकात गेल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेत "सचिनभैय्या" हे नाव अग्रक्रमाने ऐकायला मिळत आहे. त्यांच्या याच निस्वार्थी कार्यपद्धतीमुळे कोरेगावच्या जनतेमध्ये त्यांच्याबद्दल कमालीची आत्मीयता आणि विश्वासाचे घट्ट नाते निर्माण झाले आहे.
सुख-दुःखात धावून जाणारा 'घरातील माणूस'
कोरेगाव शहरातील प्रत्येक वार्डात सचिनभैय्या बर्गे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. केवळ निवडणुकीपुरते राजकारण न करता, नागरिकांच्या सुखदुःखात चोवीस तास धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची जनमानसात ख्याती आहे. शहरात कुठेही लग्नसोहळा असो, साखरपुडा असो, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम असो किंवा एखाद्या कुटुंबावर ओढवलेली दुःखद घटना असो — प्रत्येक ठिकाणी वेळेत उपस्थित राहून संबंधित कुटुंबाला सर्वतोपरी आधार देण्याचे काम सचिनभैय्या बर्गे सातत्याने करत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे ते केवळ एक राजकीय नेते न राहता, शहरातील प्रत्येक कुटुंबातील हक्काचे सदस्य बनले आहेत.
संयमी भाषा आणि सर्वसमावेशक कार्यशैली
आजकालच्या राजकारणात अनेकदा आक्रमक भाषा, चिखलफेक किंवा वादग्रस्त वक्तव्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो; मात्र सचिनभैय्या बर्गे याला अपवाद ठरले आहेत. राजकारणात असूनही त्यांनी आजपर्यंत कोणालाही दुखावेल अथवा कोणाचा अवमान होईल अशी भाषा कधीही वापरलेली नाही. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, आदराने आणि संयमाने वागणारे एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळेच आज केवळ युवक वर्गच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी तसेच शहरातील व्यापारी वर्गामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड सकारात्मक आणि आदराची भावना दिसून येत आहे.
सर्व घटकांना सोबत घेणारा दूरदृष्टीचा नेता
कोरेगाव शहरातील मुख्य भागासह नव्याने विकसित झालेल्या वाढवस्ती भागातही सचिनभैय्या बर्गे यांचा जनसंपर्क थक्क करणारा आहे. विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सर्वदूर आपली एक वेगळी छाप पाडली आहे. कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व धर्म, जाती आणि समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची सर्वसमावेशक कार्यशैली आहे. यामुळेच कोरेगावचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर बर्गे यांच्यासारख्या अजातशत्रू आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची शहराला गरज असल्याचे मत अनेक बुद्धिवंतांकडून व्यक्त केले जात आहे.
विकासाला गती मिळण्याचा विश्वास
"सचिनभैय्या बर्गे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यास कोरेगाव शहराच्या रखडलेल्या विकासाला मोठी गती मिळेल," असा ठाम विश्वास शहरातील विविध घटकांनी व्यक्त केला आहे. शहरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न, अंतर्गत रस्ते, अखंडित आणि शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छता मोहीम, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम तसेच नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून एक पारदर्शक व नागरिकाभिमुख प्रशासन उभे करण्याची क्षमता केवळ सचिनभैय्या बर्गे यांच्या सक्षम नेतृत्वातच आहे, असे सूर आता कोरेगावातून उमटू लागले आहेत.
आमदार महेश शिंदे यांच्या निर्णयाकडे कोरेगावची नजर!
दरम्यान, कोरेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आणि डॅशिंग आमदार महेश शिंदे यांनी या वाढत्या लोकभावनेचा आणि जनरेटाचा गांभीर्याने विचार करावा. त्यांनी सर्वसामान्य जनतेचा कौल ओळखून सचिनभैय्या बर्गे यांनाच नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी द्यावी, अशी मागणी आता दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. सर्वसामान्य ग्रामस्थ, युवक कार्यकर्ते, महिला मंडळे तसेच विविध व्यापारी संघटनांकडून ही मागणी लावून धरली जात आहे. आगामी काळात या नगराध्यक्ष निवडीवरून कोरेगावच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडण्याची आणि राजकीय वातावरण अधिकच गती घेण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी जनतेतून स्वयंस्फूर्तीने पुढे येणारे एकमेव नाव म्हणून सध्या सचिनभैय्या बर्गे यांच्याकडे पाहिले जात असून, त्यांची "जनतेचा सच्चा नेता" ही ओळख या निमित्ताने अधिक दृढ झाली आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय