single-post

राजन धर्माधिकारी यांना ‘दादासाहेब साखवळकर सामाजिक पुरस्कार’ प्रदान

राजन धर्माधिकारी यांना ‘दादासाहेब साखवळकर उत्कृष्ट भजन गायक पुरस्कार’ प्रदान

19 May, 2026

कोरेगाव (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा) :

येथील प्रसिद्ध उद्योजक व उत्कृष्ट भजन गायक राजन धर्माधिकारी यांना कला आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यावर्षीचा मानाचा “दादासाहेब साखवळकर सामाजिक पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. दादासाहेब साखवळकर यांच्या ५१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दादासाहेब साखवळकर ट्रस्टच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.

​संत तुकाराम महाराज यांचे वंशज  श्री मोरे  यांच्या हस्ते राजन धर्माधिकारी यांना हा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला. उत्कृष्ट भजन गायक म्हणून त्यांनी केलेल्या प्रदीर्घ सेवेची आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. या सोहळ्यात स्वतः वाघ महाराज यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

​या सोहळ्याप्रसंगी दादासाहेब साखवळकर ट्रस्टचे पदाधिकारी, सुरेशजी साखळकर, बापूसाहेब भोसले यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला कोरेगाव शहर व परिसरातील ग्रामस्थ आणि भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

राजेंद्र धर्माधिकारी यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यातून व जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार महेश शिंदे, तसेच ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुरेश बोतालजी, दादासाहेब माने आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी धर्माधिकारी यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.