विद्यार्थ्यांसाठी ‘दर्पण’चा स्मार्ट बुस्टर डोस!यशाचा 'शॉर्टकट' नव्हे, यशाचा 'स्मार्ट मार्ग'! कोरेगावात 'एसएससी स्मार्ट टिप्स'चा धमाका
कोरेगावात ‘एसएससी स्मार्ट टिप्स’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भीती पळाली, आत्मविश्वास वाढला
17 January, 2026
कोरेगाव:दि.१७ (जरंडेश्वर समाचार वृत्तसेवा):
दहावीची परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसून ते करिअरचे पहिले मोठे प्रवेशद्वार आहे. या परीक्षेकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलावा आणि त्यांनी तणावमुक्त होऊन 'स्मार्ट' पद्धतीने यश मिळवावे, यासाठी कोरेगाव येथील दर्पण कॉम्प्युटरने कंबर कसली आहे. एमकेसीएलच्या सहकार्याने आयोजित 'एसएससी स्मार्ट टिप्स' या कार्यशाळेने सध्या तालुक्यात शैक्षणिक क्रांतीची लाट आणली असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याला खऱ्या अर्थाने नवी दिशा मिळत आहे.
भीती गेली, जिद्द आली!
गेल्या दीड महिन्यांपासून अविरत सुरू असलेल्या या कार्यशाळेत केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, तर विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले जात आहे. परीक्षेच्या काळात वेळेचे नियोजन कसे करावे, पेपर कव्हर करताना होणारी धांदल कशी टाळावी आणि मुख्य म्हणजे 'बोर्डाला अपेक्षित उत्तर' कसे लिहावे, याचे प्रॅक्टिकल डेमो येथे दिले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
तालुक्यातील शाळांची मांदियाळी
या उपक्रमाचा आवाका इतका मोठा आहे की, तालुक्यातील जवळपास सर्वच प्रमुख शाळांनी यात सहभाग नोंदवला आहे. न्यू इंग्लिश स्कूल (एकसळ, न्हाळेवाडी, भोसे, कुमठे, रुई), दि मॉडर्न इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, अपशिंगे, तडवळे, शिरंबे, आझादपूर, चिमणगाव, तांदुळवाडी, साप, जांब-त्रिपुटी, खेड, अंभेरी, एकंबे यांसारख्या अनेक गावांतील शाळांनी या कार्यशाळेला पसंती दिली आहे.
मोफत मार्गदर्शनाचे 'दर्पण' मॉडेल
आजच्या व्यावसायिक युगात जिथे मार्गदर्शनासाठी हजारो रुपये मोजावे लागतात, तिथे दर्पण एज्युकेशन सोसायटी पूर्णतः विनामूल्य कार्यशाळा राबवत आहे. शनिवारी रुई येथील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला, तर २० जानेवारीला रहिमतपूर, चंचळी, शिरढोण आणि जयपूर येथील विद्यार्थी मार्गदर्शनासाठी सज्ज झाले आहेत.
ठळक वैशिष्ट्ये: का ठरतेय ही कार्यशाळा खास?
- उत्तरलेखन कौशल्य: मुद्देसूद उत्तरे लिहून पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची कला.
- टाईम मॅनेजमेंट: अडीच-तीन तासांच्या पेपरचे मिनिटा-मिनिटाचे नियोजन.
- मानसिक तयारी: परीक्षेचा फोबिया काढून विद्यार्थ्यांचे समुपदेशन.
- अनुभवी मार्गदर्शक: तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन.
आवाहन
"आमचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेसाठी सक्षम करण्याचा आहे. ज्या शाळांना अजूनही या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी वेळ न घालवता दर्पण कॉम्प्युटर, कोरेगावशी संपर्क साधावा."
— संतोष नलवडे, संस्थापक अध्यक्ष, दर्पण एज्युकेशन सोसायटी.कोरेगाव:

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय