single-post

छत्रपतींचा पहिला अश्वारूढ पुतळा उभारण्याचे भाग्य मिळाल्याची पालकमंत्र्यांची भावना..!

शिवतीर्थाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध..!

20 February, 2025

पाटण दि.२०(प्रतिनिधी):
पाटण मतदार संघात माझ्या कार्यकाळात मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा आणि शिवतीर्थ उभारण्याचे भाग्य मिळाले.यापुढेही राज्यातील  शिवतीर्थाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सदैव कटीबद्द राहील असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
ते पाटण तालुक्यातील नाडे येथे शिवजयंती च्या निमित्ताने पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले,महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी करणारे आणि  राज्याला नवी दिशा देणारे  तत्कालीन गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी समुद्रमार्गे येणाऱ्या परदेशी नागरिक अथवा पर्यटकांनी भारतात पाऊल ठेवताना छत्रपती शिवरायांनाच्या पुढे नतमस्तक व्हावे या उद्देशाने मुंबई येथील गेट वे ऑफ येथे महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा उभारला.अगदी हुबेहूब त्याच अश्वारूढ पुतळ्याची पहिली प्रतिकृती आपणाला माझ्या पाटण मतदार संघाच्या प्रवेशद्वारावर उभारण्याची संधी मिळाली.हा केवळ अश्वारूढ पुतळा नव्हे तर खऱ्या अर्थाने पाटण मतदारसंघातील पहिले शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ उभारण्याचे भाग्य मला मिळाले.

 मंत्री देसाई पुढे म्हणाले,शिवतीर्थ उभारल्यानंतर हा पहिलाच शिवजयंती सोहळा असून या पुढे ही राज्यातील सर्वच शिवतीर्थावर सर्वांगीण विकास आणि दिमाखदार शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील असल्याची माहिती ही पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी दिली.