कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवड: सभापतीपदी अधिक माने, तर उपसभापतीपदी केशव मदने बिनविरोध निवड
रिक्त पदांवर बिनविरोध निवड; बाजार समितीत उत्साहाचे वातावरण
05 December, 2025
कोरेगाव दि.५ डिसेंबर २०२५│ कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या गुरुवारी झालेल्या विशेष बैठकीत समितीच्या रिक्त झालेल्या पदांवर निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीत सभापतीपदी अधिक माने तर उपसभापतीपदी केशव मदने यांची एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकीस अध्यक्षस्थानी अभिमान थोरात (सहाय्यक निबंधक – सहकार विभाग) होते. दोन्ही पदांसाठी दाखल झालेले अर्ज एकमेव असल्याने निवड प्रक्रियेत कोणतीही स्पर्धा झाली नाही आणि निवड बिनविरोध पार पडली.
यापूर्वीचे सभापती कल्याण भोसले आणि उपसभापती वैशाली भोसले यांनी १७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या राजीनाम्यानंतर पदे रिक्त होती. नियमानुसार रिक्त पदे भरण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती.
नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होताच उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. बाजार समितीच्या दृष्टीने शेतकरी हित, सुविधा वाढ, पारदर्शकता आणि बाजार व्यवस्थेचे आधुनिकीकरण ही आगामी प्राधान्ये असल्याचे नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या वेळी संचालक, कर्मचारी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय