single-post

दलित अत्याचाराविरोधात कोल्हापूर ते नांदेडपर्यंत आक्रोश

साताऱ्यात आरपीआय चा दि. 15 डिसेंबर ला आक्रोश मोर्चा

10 December, 2025

सातारा दि.१०(जरंडेश्वर समाचार) : राज्यात वाढत्या जातीय व धार्मिक अत्याचाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सातारा जिल्ह्याच्यावतीने ‘आक्रोश महामोर्चा’ काढण्यात येणार असून, सोमवारी १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे. नंतर मोर्चा राजपथ मार्गे मोती चौक–५०१ पाटी–पोवई नाका होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन RPIचे ज्येष्ठ नेते मा. संजय  गाडे यांनी केले आहे.

राज्यात दलित अत्याचारांचा विस्फोट — RPIचे आंदोलन तापले

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून जातीय वैमनस्याच्या घटना वाढत असून, दलित, वंचित आणि समाजातील पिडीत वर्गावर अत्याचारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे.

नांदेडमधील प्रेमविवाहास नकार देऊन केवळ जात दाखवत एका युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना ताजी असतानाच, साताऱ्यातील अतुल भिसे या मातंग समाजातील तरुणाला सवर्ण मानसिकतेतून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचे धक्कादायक आरोप झाले आहेत.

“मला चिड येत नाही, हाच माझा गुन्हा” हे अतुलने लिहिलेले शब्द समाजमनाला हादरवून गेल्याचे RPIने म्हटले आहे.

“जातवादाला सरकारी पाठबळ? — सरकारला जाब विचारणार!”

RPIचे ज्येष्ठ नेते संजय गाडे म्हणाले,“छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, आॕण्णाभाऊंच्या महाराष्ट्रात जातीय द्वेषाची विषबाधा पुन्हा वाढते आहे. दलित तरुणांचे मुडदे पडत आहेत, खून–आत्महत्या वाढत आहेत. अशा घटनांना सरकारचे नाकर्तेपण जबाबदार आहे. आता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.”

‘आक्रोश’चा जाज्वल्य स्वर — ढसाळांचे शब्द मोर्चात गुंजणार

मोर्चाच्या आवाहनात पँथर नामदेव ढसाळ यांनी लिहिलेल्या पंक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे—

“रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यानो,आता वा शहरांना आग लावत चला…”या जाज्वल्य शब्दांनी आंदोलनाला ताप चढला आहे.

महामोर्चासाठी नेत्यांची एकजूट, या मोर्चात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(जनरल आघाडी, युवक आघाडी, महिला आघाडी)जिल्हा–तालुका–शहरातील सर्व पदाधिकारी सहभाग करणार असून, प्रमुख नेत्यांमध्ये—संजय  गाडे,गणेश भिसे – जिल्हाध्यक्ष,सुंदर ओव्हाळ, बाबू वायदंडे, गणेश वाघमारे,सागर भिसे, दयानंद नागटिळक, विशाल कोळी, विशाल भिसे,

दिपक कुचेकर, विक्रम साठे, आदित्य कुचेकर,

ऋतुराज चांदणे, गणेश देवकुळे, राहुल कमाने,

निखिल अवघडे, रोहित कडाळे, सनी काटे,

आकाश कांबळे, नलीनी घाडगे, सुचित्रा कडाळे

आदींचा सहभाग राहणार आहे.

हजारोंचा ऐतिहासिक मोर्चा अपेक्षित वंचित, दलित, शोषित वर्गातील स्त्री–पुरुषांना या मोर्चात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, साताऱ्यात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरण्याची दाट शक्यता आहे.