single-post

अबकड आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणीची मागणी- -आ.अमित गोरखे

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांचे आंदोलन, लढा आणखी तीव्र करणार

09 December, 2025


मुंबई दि.९(जरंडेश्वर समाचार) : अबकड समाजाला न्याय मिळावा व त्यांच्या आरक्षणाच्या मागणीची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. युवा आमदार अमित गोरखे आणि आमदार जितेश अंतापूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात आमदार कृपाल तुमाने व आमदार काळे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत ठाम भूमिका मांडली.

राज्यातील ५९ जाती आणि वंचित घटकांना न्याय्य हक्क मिळण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, शासनाने त्वरित निर्णय घेऊन अबकड समाजाला आरक्षणाचा लाभ लागू करावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.

आमदारांनी विधानभवनासमोर घोषणा देत सरकारचे लक्ष वेधले आणि या प्रश्नावर आता आणखी वेळ न दवडता ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली.

या प्रसंगी बोलताना आमदारांनी स्पष्ट केले की :

"आम्ही आरक्षण भीक म्हणून मागत नाही, हा आमचा संविधानसम्मत हक्क आहे.

सरकारने विलंब करणे थांबवून त्वरित अंमलबजावणी करावी.

हा लढा न्यायाचा आहे आणि तो अधिक तीव्र करण्यात येईल.

अबकड समाजाच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आगामी काळात व्यापक आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशाराही या आंदोलनातून देण्यात आला.

मुख्य मागण्या

अबकड आरक्षणाचा शासन निर्णय तातडीने लागू करावा

५९ जातींची सामाजिक-शैक्षणिक स्थितीचा स्वतंत्र अभ्यास स्वीकारावा

वंचित घटकांना शिक्षण, नोकरी आणि संधीमध्ये समान हक्क मिळेल

या आंदोलनानंतर राज्यातील अबकड समाजामध्ये उत्साह आणि आशेचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारकडून आता निर्णायक भूमिका अपेक्षित असल्याचे जाणवते.