प्राथमिक आरोग्य केंद्र सदाशिवगड १०० दिवस मोफत क्षयरोग तपासणी
प्राथमिक आरोग्य केंद्र सदाशिवगड येथे क्षयरोग मोहिम व आरोग्य तपासणी शिबीर
20 February, 2025
सदाशिवगड दि.२० (प्रतिनिधी):आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा व प्राथमिक आरोग्य केंद्र, सदाशिवगड यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र सदाशिवगड ता. कराड येथे १०० दिवस क्षयरोग मोहिम व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आ. मनोज घोरपडे धैर्यशील कदम जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी रामकृष्ण वेताळ, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा भा.ज.पा.,सागर शिवदास, मा. जि. प. सदस्यमा. चंद्रकांत मदने, मा. पं. स. सदस्यमा. डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी सातारामा. डॉ. सुनिल चव्हाण, जिल्हा क्षय रोग अधिकारी सातारामा. डॉ. संजय कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी सातारामा, Things पाटील, गट विकास अधिकारी, कराडमा. डॉ. नरेंद्र माळी, तालुका आरोग्य अधिकारी, कराड उपस्थित राहणार आहेत.या शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टर सहभागी होऊन रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणारं आहेत.तरी सदाशिवगड पंचक्रोशी परिसरातील गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ.सुनील थोरात यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करणेकामी या कार्यक्षेत्रातील सर्व गामपंचायतीचे सरपंच/उपसरपंच,डॉ. सुनिता थोरात,वै.अ.प्रा. आ. केंद्र सदाशिवगड मधील सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.