राजकीय नेत्यांच्या सेवेसाठी वापरली जाणारी शासकीय गाडी; साखरेच्या पोत्यांसह उत्पादन शुल्क विभागाची गाडी आढळल्याने खळबळ — घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध होताच चौकशी व कारवाईची मागणी
साखरेच्या पोत्यांसह पकडली शासकीय गाडी; सातारकरांचा रोष उसळला" ;. "उत्पादन शुल्क विभागाची गाडी ‘दिवाळी भेट’ वाटताना! नागरिकांचा संताप ओसंडला" ;. "राजकीय चाकरीत अडकले अधिकारी? उत्पादन शुल्क विभागावर गंभीर आरोप"
20 October, 2025
सातारा, दि. २० ऑक्टोबर (जरंडेश्वर समाचार):-सातारा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात अडकला आहे. विभागाची अधिकृत शासकीय गाडी क्रमांक MH 11 DA 0126 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या पोत्यांसह कराड व सातारा परिसरात फिरताना आढळल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे साताा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे..
स्थानिक पत्रकार महेश पवार (9TV न्यूज) यांनी तयार केलेल्या या व्हिडिओत, गाडीत दोन व्यक्ती साखरेची पोती उतरवताना दिसत आहेत. त्या पोत्यांवर “लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना – दिवाळी भेट” असा उल्लेख असल्याचे स्पष्ट दिसते. संबंधित गाडी राज्य उत्पादन शुल्क विभागाची असल्याने, ती अधिकृत कामासाठी वापरली गेली की राजकीय भेटवस्तूंच्या वितरणासाठी, याचा खुलासा करणे आवश्यक असल्याची मागणी जिल्ह्यातून होत आहे.
राजकीय हस्तक्षेपाचे आरोप,गेल्या काही वर्षांपासून या विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हे राजकीय नेत्यांच्या प्रभावाखाली काम करतात, असा आरोप स्थानिक नागरिक आणि समाजकार्यकर्त्यांकडून सातत्याने होत आहे. काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील एका स्टार हॉटेलमध्ये झालेल्या खासगी सोहळ्यात विभागातील अधिकारी यजमानांच्या सेवेत मग्न असल्याचा प्रकारही चर्चेत आला होता.
गंभीर चौकशीची मागणी,या घटनेची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, तसेच दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. “फक्त तात्पुरत्या बदलीने प्रश्न सुटणार नाही; जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांकडे अपेक्षा,विभागीय अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अजित पवार यांच्याकडेच सातारकरांचे लक्ष लागले आहे.
ही घटना केवळ एका गाडीपुरती मर्यादित नसून, शासकीय यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप किती खोलवर शिरला आहे, याचे प्रतीक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दिवाळीची भेट द्यायला कोणाचा विरोध नाही मात्र शासकीय गाडीचा वापर करणे, अयोग्य आहे, भरारी पथकाला गाडी नाही , गाडीची मागणी होत आहे आणि एका बाजूला अशा पद्धतीने या गाडीचा वापर चुकीच्या पद्धतीने होत आहे, त्यामुळे शुल्लक विभागाच्या सर्वच गाड्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी काढून घ्याव्यात अशी मागणी सातारा जिल्ह्यातील जनतेतून होत आहे.
राज्य शुल्क विभागाचे अधिकारी भूतकरसाहेब यावर काय भूमिका घेणार ?हा कर्मचाऱ्यांचा पराक्रम आहे, भूतकर साहेब यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय