सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार ..!
भाजप स्वतंत्रपणे मैदानात; जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याचा निर्धार; चळवळीतील ३५ गट एकत्र; नव्या समीकरणाने गणित बदलणार
27 October, 2025
सातारा, दि. २७ | ऑक्टोबर (जरंडेश्वर समाचार)– आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार तयारी सुरू केली आहे. “या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार, हे जवळजवळ निश्चितच आहे,” असा ठाम दावा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी यांनी केला आहे.
भाजपची रणनिती सज्ज भाजपने सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाय रोवले असून, प्रमुख नेते व पदाधिकारी रणनीतीनुसार कामाला लागले आहेत.
माण तालुक्यातून आमदार जयकुमार गोरे, कोरेगावातून आमदार महेश शिंदे, सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, उत्तर कराडमधून आमदार मनोज घोरपडे,,दक्षिण कराडमध्ये आमदार अतुल भोसले,आणि इतर सर्व तालुक्यांतील कार्यकर्ते व पदाधिकारी पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. या संघटित प्रयत्नांमुळे सातारा जिल्ह्यात भाजपाचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात वाढेल, असा आत्मविश्वास पक्षनेत्यांमध्ये आहे. त्यामुळेच स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोर जातील.
राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद टिकवण्याचा प्रयत्न. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी पुन्हा मजबूत केली आहे. असून सातारा जिल्ह्यात मध्ये मेळावे व्यक्तिगत गाठीभेटी सुरू केले आहेत, त्यांनी सातारा व जावळी या दोन तालुक्यांमध्ये जोरदार तयारी सुरू केलेली असून, जिल्हा परिषद , पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी ते चांगली लढत देतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस गट (शरद पवार गट) भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर राहील, अशी चर्चा सुरू आहे. भाजप स्वतंत्रपणे लढणार,सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप कोणत्याही युतीशिवाय स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहे. जिल्ह्यातील वाढते संख्याबळ, संघटनशक्ती आणि नेतृत्वाच्या बळावर भाजप जिल्हा परिषदेवर स्वतःचा झेंडा फडकवेल, असा ठाम विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.
सातारा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ छत्तीस गट, एक संघ झाले असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत या निवडणुका लढण्यावर आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्ते ठाम झाले असून त्यांनी तशी शपथ ही घेतलेली आहे. कोणत्याही राजकीय आमिषाला बळी न पडता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेली राजकीय सत्तेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकसंघ राहिले पाहिजे अशी शपथ घेतली आहे, वेळ आली तरी कोणत्याही युती आघाडीमध्ये न राहता, या छत्तीस गटाबरोबर सक्रियपणे राहणार असल्याचे नेत्यांनी ठामपणे सातारा येथे झालेल्या मीटिंगमध्ये भूमिका घेतली आहे, कुणी कितीही दबाव आणला तरी आम्ही या गटातून फुटणार नाही, जे फुटतील ते आंबेडकरी चळवळीचे गद्दार असतील अशी भूमिका सातारा येथील झालेल्या सर्किट हाऊसवर मीटिंगमध्ये घेण्यात आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय प्रस्थापितांना हा मोठा धक्का मानला जात आहे,
याशिवाय आंबेडकरी चळवळीतील ३६ गटांनी एकत्र येत, आंबेडकरी चळवळीचा ध्वंज आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फडकावण्याचा प्रयत्न करणारं आहेत . माजी आमदार लक्ष्मण माने यांनी, या आंबेडकरी एकतेला पाठिंबा जाहीर केला असून, मी तुमच्याबरोबर आहे असा शब्द दिला आहे,या नव्या समीकरणामुळे पारंपरिक पक्षांचे गणित बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पारंपरिक मतदारसंघांमध्ये भाजपला थेट लाभ होऊ शकतो, असे निरीक्षण राजकीय तज्ज्ञ मत व्यक्त करत आहेत.
अजित दादा पवार गटाचे नेते मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील हे दोन्ही बंधू सातारा जिल्ह्यामध्ये पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश कार्यकर्त्यांचा होत असून आगामी जिल्हा परिषदेमध्ये ते भाजपाला फाईट देण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत अजित दादांच्य संख्याबळ चांगल्या पद्धतीने वाढलेला आपल्याला दिसून येईल मात्र मकरंद पटीला, नितीन पाटील यांनी जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ साधला पाहिजे, जुन्यांना विसरून चालणार नाही, नव्यां बरोबर जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांना वाटचाल करावी लागेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने ते यश मिळू शकतात.
पाटण विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ते आणि मंत्री शंभूराज देसाई हे निवडणुकीत आपलं यश आजमवण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यासमोर भाजपाचे सत्यजित पाटणकर या निवडणुकीत उतरले असून त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे पाटण तालुक्यामध्ये जोरदार फाईट जिल्हा परिषद पंचायत समितीची होणार असून यामध्ये सत्यजित पाटणकर हे वरचढ ठरण्याची शक्यता आहे ,त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ते नेते, शंभूराजे देसाई यांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत कडवी झुंज (फाईट) द्यावी लागेल, तसेच कार्यकर्त्यांचा विश्वास त्यांना निर्माण करावा लागेल , गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांना मिसळावे लागेल तरच त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
मनसे कम्युनिस्ट राष्ट्रीय समाज पक्ष या निवडणुकीत आपले नशीब आजमावूणयाचा प्रयत्न करतील,इतर छोटे मोठे सामाजिक संघटना अपक्ष असे उमेदवार या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात उतरतील
राजकीय रंगत वाढणार,आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता असून, त्यापूर्वी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीचा वेग वाढवला आहे. प्रस्थापित नेते, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि नव्या युवा नेतृत्वामुळे सातारा जिल्ह्यातील निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय