प्रतापगडावर शिवप्रेमीच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला
छत्रपती शिवाजीमहाराज जयंती किल्ले प्रतापगडावर मोठ्या उत्साहात साजरी
19 February, 2025
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २९५ व्या जयंतीनिमित्त किल्ले प्रतापगडावर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. सुर्योदयाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात सुरवात झालेल्या सोहळ्याने वातावरण भारुन गेले होते.याशनी नागराज मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, यांच्या हस्ते भवानी मातेची महाअभिषेक व पुजन करण्यात आले, भवानी मातेची मनोभावे महाआरती करण्यात आली.
भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे पूजन करून भगव्या ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी ढोल पथक, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. यावेळी प्रतापगड ग्रामस्थ व संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शिवभक्तांना अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मानाच्या पालखीची पूजा झाल्यानंतर छत्रपतीं शिवाजी महाराजाची मूर्ती असलेल्या पालखीचे लेझीम, ढोल ताशा वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणार्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवरायांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर याशनी नागराज मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुष्पअर्पण करून पूजन करण्यात आले. ’क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज…. ’या ललकारीने अन् शिवरायांच्या जयजयकाराने प्रतापगडावर शिवकाळ अवतरल्याची प्रचिती आली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बांबूच्या साह्याने काठीवर चालून शिवप्रेमी ची मने जिंकले,
छत्रपती शिवाजी महाराजाच्यावर विद्यार्थ्यांनी शाहिरी जलसा सादर केला किल्ले प्रतापगडाच्या कुशीत विसावलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या या बाल चिमुकल्यांनी बांबूच्या सहाय्याने गड सर केला. त्यांनी दोन्ही पायात काठी पकडुन त्याच्या सहाय्याने जमिनीपासून सुमारे 4 ते 5 फुट उंच असून त्यांनी नृत्य सादर केले. हे अनोखे चितथरारक नृत्य केले. हे अनोखे नृत्य व चितथरारख कला कृती शिकवण्यासाठी शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी प्रतापगड कुंभरोशीचे सरपंच , उपसरपंच , ग्रामस्थ यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला, विद्यार्थी विद्यार्थििनी यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल जिल्हा परिषद च्या वतीने त्यांच्या वर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला तसेच त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रतापगडवर साप्ताहिक जरंडेश्वर समाचारने काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेषांकांचे प्रकाशन याशनी नागराजन मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश बोतालजी संपादक जरंडेश्वर समाचार,मा.श्री. विश्वास सिद.
अतिरिक्त कार्यकारी अधिकारी,राहूल कदम मुख्य लेखा व वित्त अधिकारी, निलेश घुले उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विद्यानंद यल्लामार जिल्हा समाज कल्याण अधिकारी, मा.गजानन ननावरे जिल्हा कृषी अधिकारी विभाग जि.प.,शबनम मुजावर शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जि.प सातारा,मोहसीन मोदी कार्यकारी अभियंता,अमर नलवडे कार्यकारी अभियंता.संजय लाड कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सातारा,मा.अरुणकुमार दिलपाक कार्यकारी अभियंता,यशवंत भांड गटविकास अधिकारी महाबळेश्वर, सुप्रिया चव्हाण गटविकास अधिकारी कोरेगाव ,रविंद्र खंदारे गटशिक्षणाधिकारी सातारा,संजय जाधव उपअभियंता बांधकाम,जि.प.पंचायत समिती वाई ,अजय देशपांडे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्वर ,आनंदा पळसे गटशिक्षणाधिकारी महाबळेश्वर आदी विविध खात्यांचे अधिकारी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.