single-post

“चलो सातारा!” – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात महामोर्चा

मोर्चा १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होणार

10 October, 2025

सातारा दि. १० ऑक्टोबर (प्रतिनिधी):भारताचे सरन्यायाधीश भूषण रघुनाथ गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य “संविधान बचाव महामोर्चा” काढण्यात येणार आहे.हा मोर्चा सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून याची सुरुवात करण्यात येणार आहे.

 संविधान बचाव – देश बचाव,मोर्च्याचे प्रमुख घोषवाक्य आहे — “संविधान बचाव, देश बचाव!”,“गवई साहेब के सन्मान, हम भारतीय मैदान में!”,“एक दिवस देशासाठी, माणसा माणसा जागा हो, संविधानाचा धागा हो!”या महामोर्च्यातून देशातील न्यायव्यवस्थेचे व संविधानाचे रक्षण करण्याचा आणि सरन्यायाधीश गवई यांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचा संदेश देण्यात येणार आहे.मोर्च्याच्या आयोजकांनी नागरिकांना “हजारोच्या संख्येने सहभागी व्हा” असे आवाहन केले आहे.

या महामोर्च्याचे आयोजन संविधान संघर्ष मोर्चा, सातारा जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून खालील प्रमुख संघटना सहभागी होत आहेत :

वंचित बहुजन आघाडी,ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठवले), (गवई), (आंबेडकर), (कवाडे),रिपब्लिकन सेना,बी.एस.पी.,राष्ट्रवादी पक्ष,राष्ट्रीय समाज पक्ष,दलित महासंघ,महात्मा फुले समता परिषद,समता सैनिक दल,देश प्रेमी सामाजिक संघटना,लेक लाडकी अभियान,ओबीसी समाज संघटना,डी.पी.आय.,डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना,मुस्लिम मावळा छत्रपतीचा,ऑल इंडिया पँथर सेनाजनता पार्टी दल,स्वाभिमानी शेतकरी संघटना,भारतीय बौद्ध महासभा,महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन,तसेच प्रज्ञासूर्य सामाजिक संस्था आणि विविध सामाजिक चळवळींचे कार्यकर्ते,सुप्रीम कोर्ट परिसरात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर हल्ला म्हणजे संविधानावरच आघात असल्याचे मत विविध संघटनांनी व्यक्त केले आहे. याच निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील सर्व समाजघटकांनी एकत्र येत संविधान रक्षणासाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

 सोमवार,दि. १३ ऑक्टोबर २०२५, रोजी  सकाळी ११ वा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सातारा (येथून प्रारंभ) येथून मोर्चास प्रारंभ होईल. सातारा शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा फेरी निणार असून शेवटी सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येईल.

????️ आयोजकांचे आवाहन-संविधान संघर्ष मोर्च्याचे पदाधिकारी म्हणाले, “न्यायव्यवस्था आणि संविधान यांच्यावर कुणाचाही अपमान होऊ देणार नाही.देशाच्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सर्व नागरिक एकत्र येऊया.

हा मोर्चा कोणत्याही पक्षविरोधी नाही, तर संविधान आणि न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठीचा लढा आहे.” मोर्च्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागाने विशेष बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.

सातारा शहरातील वाहतुकीसंबंधी मार्गदर्शन व बंदोबस्ताबाबत प्रशासन लवकरच सूचना प्रसिद्ध करणार आहे.

> “संविधान आपला सामान्य जनतेचा आत्मा  आहे,

न्याय हा आपला मार्ग आहे,

आणि समानता हेच आपले ध्येय आहे.”

साताऱ्यातील हा महामोर्चा केवळ निषेध नव्हे तर लोकशाही आणि न्यायाच्या मूल्यांचे पुन्हा अधोरेखन ठरणार आहे.