चीनच्या ‘ट्रिपल न्यूक्लियर स्ट्राइक’ प्रयोगाने खळबळ
जग हादरले : चीनने एकाच वेळी जमिनीवरून, समुद्रावरून आणि हवेतून आण्विक मारा करण्याची क्षमता दाखवली ;. ‘न्यूक्लियर ट्रायड’ – तिहेरी प्रणालीसमोर कोणतीही मिसाइल डिफेन्स सिस्टम निष्प्रभ ठरण्याची भीती ; अमेरिकेसमोर नवे आव्हान, रशियाशी बरोबरी; जागतिक शस्त्रस
02 October, 2025
नवी दिल्ली | २८ (जरंडेश्वर समाचार) –चीनने नुकताच केलेल्या ‘ट्रिपल न्यूक्लियर स्ट्राइक’ प्रयोगाने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडवली आहे. एकाच वेळी जमिनीवरून, समुद्रावरून आणि हवेतून आण्विक क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची क्षमता चीनने प्रदर्शित केल्याचे संकेत मिळाले असून यामुळे जगभरातील सुरक्षा तज्ज्ञांमध्ये चिंता वाढली आहे.
काय आहे ‘ट्रिपल स्ट्राइक’?सामरिक भाषेत या तिहेरी प्रणालीला न्यूक्लियर ट्रायड म्हटले जाते. यात –जमिनीवरून हल्ला – दीर्घ पल्ल्याची ICBMs क्षेपणास्त्रे,समुद्रावरून हल्ला – पाणबुड्यांतून दागली जाणारी SLBMs,हवेतून हल्ला – स्ट्रॅटेजिक बॉम्बर्समधून आण्विक बॉम्ब –या तिन्ही मार्गांचा समावेश होतो.तज्ज्ञांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही देशाची मिसाइल डिफेन्स सिस्टम फारशी परिणामकारक राहात नाही.
जागतिक सुरक्षा समीकरण बदलणार?
अमेरिका आणि रशिया या महासत्ता आधीपासूनच अशा क्षमतेसह सज्ज आहेत. आता चीननेही या गटात प्रवेश केला आहे.
अमेरिकेसाठी नवे आव्हान : अमेरिकेच्या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीसमोर ही क्षमता मोठे आव्हान ठरू शकते.
शस्त्रस्पर्धेला गती : आण्विक शस्त्रास्त्र नियंत्रण करारांवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
चीनचा दबदबा : या प्रयोगामुळे चीनने जागतिक सुरक्षाव्यवस्थेत स्वतःचा प्रभाव वाढवला आहे.
भारतासाठी संकेत काय?दक्षिण आशियातील सामरिक समीकरणात या प्रयोगामुळे भारतासमोर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.रणनीतिक संतुलन ढळण्याची भीती : चीनची क्षमता वाढल्यास पाकिस्तानसोबत त्याचे सामरिक समीकरण भारतासाठी अधिक धोकादायक ठरू शकते.
दोन आघाड्यांचा धोका कायम : चीन आणि पाकिस्तानकडून एकत्र दबाव वाढू शकतो. भारताची तयारी आवश्यक :मिसाइल डिफेन्स प्रणाली अधिक सक्षम करणे,‘द्वितीय हल्ला क्षमता’ (Second Strike) – म्हणजेच पाणबुड्यांतून अण्वस्त्रे सोडण्याची विश्वासार्ह क्षमता – मजबूत करणे, तसेच सायबर व अंतराळ सुरक्षेत गुंतवणूक वाढवणे अपरिहार्य ठरणार आहे.
चीनची धडाकेबाज प्रगती,विज्ञान, तंत्रज्ञान आणि लष्करी क्षेत्रात चीन गेल्या दोन दशकांत झपाट्याने प्रगती करत आहे. सतत नवनवीन प्रयोग आणि धाडसी चाचण्या हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. ‘ट्रिपल न्यूक्लियर स्ट्राइक’ ही त्याचीच पुढची पायरी असून यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
तज्ज्ञांच्या मते, चीनचा हा प्रयोग ही केवळ तांत्रिक झेप नसून जागतिक सुरक्षाव्यवस्थेला धक्का देणारी घटना आहे. भारतासाठी हा मोठा इशारा आहे की, आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलत आहे आणि संरक्षण धोरणात तातडीने बदल करण्याची वेळ आली आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय