साताऱ्यातील नगर परिषदेची निवडणूक: ऐतिहासिक बालेकिल्ल्यातील चुरशीची लढाई ..!
पाणी, रस्ते, आरोग्यसेवा या स्थानिक प्रश्नांवर उमेदवारांची कसोटी .;महायुतीतील नाराज कार्यकर्त्यांचे बंड एनसीपी व वंचित आघाडीला लाभदायक?
22 September, 2025
✍️ संपादकीय साताऱ्यातील नगर परिषदेची निवडणूक: ऐतिहासिक बालेकिल्ल्यातील चुरशीची लढाई ..!
सातारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणात "विचारसरणीचा गड" म्हणून ओळखला जातो. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांनी येथे पिढ्यानपिढ्या जनतेला घडवले. याच पार्श्वभूमीवर साताऱ्याचे राजकारण नेहमीच विचारांवर आधारित राहिले. काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा गड मानला जात असला तरी २०१४ नंतर भाजपने हा बालेकिल्ला उध्वस्त केला आणि सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलली.
आज पुन्हा एकदा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या गडावर कोणाचे झेंडे फडकतील, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
त्रिपक्षीय सामना : चुरशीचे राजकारण
यंदा साताऱ्यातील लढाई त्रिपक्षीय ठरण्याची चिन्हे आहेत –
1. भाजप-महायुती
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपची मोर्चेबांधणी.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवरील नियंत्रणामुळे आत्मविश्वास वाढला.
पण जागावाटप व गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सुर वाढेल त्यांचे समजूत काढता काढतांना नेत्यांना नाकी नऊ येतील.
2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली "स्वबळावर" लढाईची घोषणा.
कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि महाआघाडीसोबत न जाण्याचा ठाम निर्णय.
शरद पवार यांच्या सहकारी चळवळीच्या वारशाचा आधार.
3. वंचित बहुजन आघाडी
दलित, ओबीसी आणि मुस्लिम मतदारांचा मजबूत पाया.
एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव.
गणेश भिसे यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात सक्रिय संघटन.
"किंगमेकर" ठरण्याची सर्वाधिक शक्यता वाटत आहे.
स्थानिक व सामाजिक प्रश्न
पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्यसेवा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मुद्दे आहेत.
दलित-मुस्लिम समाजाची मोठी वोट बँक निर्णायक ठरणार.
जर ही वोट बँक वंचित बहुजन आघाडीकडे एकवटली, तर महायुतीसमोर अडचणी उभ्या राहतील अशी शक्यता वाटत आहे.
आगामी राजकीय परिणाम
भाजप जिंकला तर साताऱ्यातील आपले वर्चस्व अधिक भक्कम करेल व २०२७ विधानसभा निवडणुकीसाठी तयारी मजबूत करेल.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) विजयी झाला, तर फुटीनंतरचा आत्मविश्वास पुन्हा मिळवेल आणि जिल्ह्यातील संघटन पुन्हा उभे राहील.
वंचित बहुजन आघाडीचा उदय झाला, तर साताऱ्यात चौथ्या पर्यायाचे राजकारण स्थिरावेल आणि दलित-मुस्लिम-ओबीसी समीकरण भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा देईल.
????️ संपादकीय मत
साताऱ्यातील ही निवडणूक फक्त स्थानिक नगर परिषदेची लढाई नाही, तर राज्याच्या राजकारणाचा पाया आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे व मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या एकत्रित ताकदीपुढे भाजप मजबूत वाटत असला, तरी गटबाजी आणि बंडखोरीची छाया त्यांना त्रासदायक ठरू शकते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे "स्वबळावर" लढण्याच्या भूमिकेत उतरले असून, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक अधिक गुंतागुंतीची करतील. त्यांची प्रत्येक सीटवरची उपस्थिती निकालाला वेगळी दिशा देऊ शकते
सातारा नगर परिषदेची लढाई ही साधी निवडणूक नाही; ही महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यातील "लिटमस टेस्ट" ठरणार आहे.
-सुरेश बोतालजी संपादक मो-९१ १२ ६५० ६५०