त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर अमानुष हल्लाचा जाहीर निषेध; संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करावी-सुरेश बोतालजी
लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न – निषेधाची लाट उसळली
21 September, 2025
त्र्यंबकेश्वर दि.२१ (जरंडेश्वर समाचार) : त्र्यंबकेश्वर परिसरात तीन नामांकित पत्रकारांवर गावगुंडांनी केलेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. झी 24 तासचे ब्युरो प्रमुख योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे किरण ताजणे हे पत्रकार हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून, त्यातील किरण ताजणे यांना अधिक दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा तीव्र शब्दात आम्ही जाहीर शब्दात निषेध करीत आहोत, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे आणि पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे अशी मागणी सुरेश बोतालजी पत्रकार सातारा यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले पत्रकारांवरचा हा हल्ला केवळ व्यक्तींवर नसून लोकशाहीवरील थेट आघात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे याबाबत सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
“पत्रकार हे समाजाचे डोळे-कान आहेत. त्यांच्यावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला.”
“सरकारने तात्काळ कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा ”करावे एवढीच माफक अपेक्षा!
✍️ संपादकीय..!
पत्रकार संरक्षण कायदा : कागदावरच प्रभावी, अंमलबजावणीत मर्यादा..!
कठोर अंमलबजावणीशिवाय पत्रकार सुरक्षेची हमी अशक्य..!
पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्र सरकारने २०१७ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू केला असला तरी त्याची अंमलबजावणी अत्यंत मर्यादित आणि प्रभावहीन ठरत आहे. कायदा कागदावर आहे, परंतु प्रत्यक्षात पत्रकारांना सुरक्षिततेची हमी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
कायद्यातील तरतुदींनुसार पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, विशेष न्यायालयीन प्रक्रिया व्हावी आणि दोषींना तातडीने शिक्षा व्हावी असे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात पोलीस चौकशीला विलंब, राजकीय दबाव व कायद्याची लवचिक अंमलबजावणी यामुळे हल्लेखोर अनेकदा मोकाट फिरताना दिसतात.
लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कठोर आणि प्रभावीपणे झालीच पाहिजे. अन्यथा पत्रकार भीतीच्या छायेत काम करतील आणि जनतेचा आवाज दाबला जाईल. सरकारने तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
२०१७ मध्ये महाराष्ट्रात देशातील पहिला पत्रकार संरक्षण कायदा लागू
पत्रकार, मीडिया कर्मचारी यांना ड्युटीवर असताना झालेल्या हल्ल्यासाठी विशेष तरतुदी
हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक, दोन ते पाच वर्षे तुरुंगवास व दंडाची तरतूद
पत्रकारांवर हल्ल्यांची चौकशी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी विशेष पोलिस अधिकारी नियुक्त करण्याची अपेक्षा
तरीही अंमलबजावणीत अनेक त्रुटी : गुन्हे दाखल होण्यास विलंब, दबावामुळे केस मागे घेणे, कमी शिक्षा
पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची खरी ताकद न्यायालयीन व प्रशासकीय पातळीवर उमटत नाही.
हल्लेखोरांना राजकीय छत्रछाया मिळाल्यास कारवाई लांबते,अनेक पत्रकारांना न्यायालयीन लढाईतच त्रास सहन करावा लागतो,पोलीस चौकशीला वेग न लागल्याने पत्रकार भयभीत होतात,म्हणूनच केवळ कायदा पुरेसा नाही, त्याची काटेकोर अंमलबजावणी, विशेष न्यायालये व दोषींवर तात्काळ शिक्षा ही लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यावश्यक आहे.
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर गावगुंडांचा हल्ला,योगेश खरे, अभिजीत सोनवणे व किरण ताजणे जखमी,किरण ताजणे गंभीर जखमी असल्याची माहिती,सर्वत्र निषेधाची लाट – सरकार व पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी पत्रकार म्हणून करीत आहोत. आज राज्यामध्ये पत्रकारांच्या मोठ्या प्रमाणात हल्ली होत आहे परंतु पत्रकार संरक्षण कायदाची अंमलबजावणी केली जात नाही हे दुर्दैवी बाब आहे. राज्यातील काही नेते पत्रकारांना धमक्या देणे, वर्तमानपत्राची होळी करणे, पत्रकांच्यावर दावा दाखल करणे, असे प्रकार घडत आहेत समाजामध्ये हेच नेते मंडळी वावरत असतात,जसे वावरत , बोलतात,तसे त्यांचे लेखन पत्रकार करीत असतात , वास्तविक पत्रकार त्यांचे सर्व काही खरे रुप लेखन करत नाही ते जर केले तर त्याचा खरा चेहरा समाजापुढे येईल समाजात फिरलणे सुद्धा अवघड होईल , परंतु पत्रकार कोणत्याही राजकीय नेत्याच्या वर चिखल फेक करीत नाहीत ,त्याचे चारित्र्यहनन होईल अशा पद्धतीने पत्रकार लेखन करीत नाहीत, वास्तव लेखन करणे, तुमच्या पद्धतीने लेखन करणे, म्हणजे पत्रकारिता नव्हे , तरी पण काही बांधव तुमचे कौतुक करतात, असो, पत्रकार हा समाजाचा आरसा आहे एवढेच राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवावे एवढीच अपेक्षा..!
-सुरेश बोतालजी संपादक मो-९१ १२ ६५० ६५०